‘विश्वास जुना संग्रामभैय्या पुन्हा’, पण मग विकासाच काय ?
अहमदनगर : ‘विश्वास जुना संग्रामभैय्या पुन्हा’ म्हणत नगर शहरांमध्ये बॅनर झळकत आहे. यावरून समजतय की इलेक्शन जवळ आले आहेत. एवढंच नव्हे तर नवरात्री उत्सवाचे अवचित्य साधून होम मिनिस्टर आणि इतर विविध स्पर्धांचं आयोजन करून संग्राम भैय्या आपला प्रचार जोरदार करत आहेत. सध्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नगर शहरांमध्ये अनेक नेत्यांची मोठी बॅनर झळकताना दिसत आहेत. या सर्व बॅनरबाजी मध्ये एक बॅनर म्हणजे ‘नगरमध्ये भविष्य आकार घेत आहे, खेळाडूंना अधिक बळ मिळत आहे’ असं मजकूर लिहिलेल्या बॅनरने लक्ष वेधले आहे. यामध्ये वाडिया पार्क क्रीडा संकुलच्या विकासासाठी रुपये १५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे आणि त्याचे काम लवकरच सुरु होणार आहे असं सांगण्यात आलं आहे. पण फक्त बॅनरबाजी करून, मोठी आश्वासने देऊन, मोठा निधी मंजूर करून काही होत नाही त्यावर अंमलबजावणी करता आली पाहिजे. पण सध्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागल्यामुळे या कामावर आता पूर्णविराम लावावा लागणार आहे. नगरमध्ये हे बॅनर झळकत आहे पण पुढील पाच वर्षांमध्ये वाडिया पार्क क्रीडा संकुलचे काम दिसेल की नाही माहिती नाही, पण हे बॅनर तर लवकरच गायब होणार आहे. आणि यासोबतच पुन्हा एकदा तरूणांच भविष्य भूतकाळात लोटलं जाणार आहे. विकास कामांची घोषण केली तर खरी, पण नंतर या कामाचं, १५ कोटी निधीचं काय झालं हे पाहण्यास नगरकरांना उत्सुकता असेल. बॅनरबाजी, घोषणाबाजी, विविध स्पर्धांचे आयोजन आणि प्रचार या सर्व गोष्टी करून संग्रामभैय्या फक्त लोकांच्या मनामध्येच राहतात पण आपल्या नगरचं काय? नगरच्या लोकांचं, तरुणांचं, नगरचं भविष्य याचं काय? यावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतो. विकासाच्या नावावर नगरमध्ये फक्त एक उड्डाणपूल सोडला तर बाकी काही नाही. नगरचे रस्ते, पाणी प्रश्न, कचरा संकलन प्रश्न अजूनही वाऱ्यावर पडली आहेत. यावर योग्य ती उपाययोजना अजूनही अमलात आणली नाही. दरवर्षी एक नवीन विकास कामाची घोषणा होते आणि त्यांचे बॅनरही झळकतात, पण त्या विकास कामांचे पुढे अंमलबजावणी होताना दिसत नाही. विश्वास जुना संग्रामभैय्या पुन्हा असं म्हणतायत खर पण विकासाच काय? हा प्रश्न नगरकरांनी संग्रामभैय्याना विचारण गरजेचे आहे.