व्यवसायाला समाजसेवेची जोड असवी -आ. संग्राम जगताप
केडगावच्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जोपासताना व्यवसायाला समाजसेवेची जोड असवी. सर्वसामान्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे, या भावनाने वासन व आहुजा परिवार योगदान देत आहे. फक्त आर्थिक दृष्टीकोन न ठेवता समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी त्यांनी घेतलेले उपक्रम प्रेरणादायी आहे. वासन व आहुजा परिवाराने व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात आपले नाव निर्माण केले आहे. कोरोना महामारीत घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्ट व आनंदऋषीजी नेत्रालय यांच्या वतीने केडगाव एमआयडीसी येथील वासन टोयोटा शोरुम येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. वासन उद्योग समूहाचे चेअरमन विजयजी वासन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी जगताप बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शिवाजी कर्डिले, अक्षय कर्डिले, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, शोरुमचे जनक आहुजा, रवींद्र बक्षी, सुमतीलाल कोठारी, राजेश भंडारी, सुजित काकडे, दामोदर भटेजा, जय रंगलानी, अमोल गाडे, जितू गंभीर, राजेश कातोरे, हनुमंत कातोरे, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, वासन टोयोटाचे बी.एस. हर्षा, सतोष जोगदंड, आनंदऋषी हॉस्पिटलचे डॉ. आनंद छाजेड, अनिश आहुजा, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, राजेश सचदेव, गुलशन कंत्रोड, राकेश गुप्ता आदी उपस्थित होते.
आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले की, वासन परिवार संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असताना राज्यातील अनेक युवकांना रोजगार देण्याचे काम केले. दरवर्षी नेत्र तपासणी शिबिर घेऊन हजारो गरजू घटकांना दृष्टी देण्याचे कार्य केले जात आहे. शिबीराच्या माध्यमातून वंचितांच्या जीवनातील अंधकार दूर करण्याचे काम सुरु आहे. तर कोरोना काळातही नाशिक मध्ये अन्न छत्र चालवून गरजूंना आधार दिला. तर नगर शहरातील लंगर सेवेला त्यांनी केलेले सहकार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत मताधिक्याने निवडून आल्याबद्दल आमदार शिवाजी कर्डिले व आमदार संग्राम जगताप यांचा नागरी सत्कार करण्यात आला. मा.आ. अरुणकाका जगताप यांनी शिबिराला भेट देऊन दरवर्षी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
या शिबिराला शहरासह उपनगरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये संध्याकाळ पर्यंत तब्बल 411 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. तर गरजूंना अल्पदरात नंबरच्या चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तर 61 रुग्णांवर अल्पदरात आनंदऋषीजी नेत्रालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
दिवसभर चाललेल्या शिबिरात नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल पोळ यांनी केले. आभार अनिश आहुजा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वासन टोयोटाचे सहकारी दिपक जोशी, प्राची जामगावकर, प्रविण जोशी, अविनाश लाळगे, समीर पवार यांनी परिश्रम घेतले.