शहरातील व्यापारी व उद्योजकांचा महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा….

विकासात्मक कामांना पाठबळ व व्यापार, औद्योगिक क्षेत्राला चालना मिळण्याठी शहरातील व्यापारी व उद्योजक एकवटले....पुन्हा जगतापांना आमदार करण्यासाठी बांधली मोट.

मंगळवारी (दि.12 नोव्हेंबर) रात्री बडीसाजन मंगल कार्यालयात शहरातील व्यापारी बांधवांचा स्नेह मेळावा पार पडला.  यामध्ये महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या पाठिशी एकजुट दाखवून त्यांना निवडून आणण्यासाठी व्यापारी व उद्योजकांनी सामुदायिक पाठिंबा दिला. यावेळी आ. जगताप यांनी व्यापारी व उद्योजकांशी संवाद साधून शहरातील विकासात्मक कामे व व्यापार आणि उद्योजकांना चालना देण्यासाठी करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली.
या मेळाव्यात व्यापारी व उद्योजकांच्या वतीने आ. संग्राम जगताप व अरुणकाका जगताप यांचा पुणेरी पगडी घालून सत्कार करण्यात आला.