सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशन
बुरुडगाव रोड येथील नक्षत्र लॉन येथे ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर ला होणार
४२ वे राज्य अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आव्हान.
नगर (प्रतिनिधी)- सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशन बुरुडगाव रोड येथील नक्षत्र लॉन येथे शनिवारी दि. ३० नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता व रविवारी १ डिसेंबर सायंकाळी ४ वाजता दोन सत्रात पार पाडण्यात येणार आहे. या राज्य अधिवेशनात सत्यशोधक समाजाच्या ध्वजारोहणाने अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात येणार असून यामध्ये पहिल्या सत्रात भारतीय लोकशाही आणि सत्यशोधक तंत्रज्ञान, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अपेक्षा आणि वास्तव, सत्यशोधक कवी संमेलन व दुसऱ्या सत्रात भारतीय परंपरेचे अब्राहणी अवैधिक प्रवाह, महिलांची वर्तमान स्थिती सत्यशोधकीय आकलन, समकालीन शेती समस्या व सत्यशोधकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन होणार आहे तसेच या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून दिनमित्र वृत्तपत्राचे संपादक उत्तमराव पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड, सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक चे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.प्रकाश हसनाळकर, सत्यशोधक विद्यापीठ यवतमाळ संचालक डॉ. ज्ञानेश्वर गोरे, सत्यशोधक समाजाचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक चोपडे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे व दुसऱ्या दिवशी रविवारी सायंकाळी ४ वाजता स्वागत अध्यक्ष उत्तमराव पाटील व प्रमुख पाहुणे जयसिंगपूरचे डॉ.राजेंद्र कुंभार, सिने अभिनेते व दिग्दर्शक सत्यशोधक किरण माने यांचे मनोगत व्यक्त होणार असून या अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागत समितीचे प्रा.एल.बी.जाधव, विलास साठे, ज्ञानदेव खराडे सर, संदीप पानमळकर, संजय गारुडकर, अशोक शेवाळे, संजय शिंदे, रामभाऊ गवळी, यादव हजारे, भाऊसाहेब खुडे, दिलीप व्यवहारे, नचिकेत लोंढे, दिलीप खराडे, बापू चंदनशिवे, डी.आर. जाधव, डॉ.हनुमंत गायकवाड, शरद मेढे, डॉ.मेहबूब सय्यद, मुख्याध्यापक अल्हाट सर, प्रा. सूर्यवंशी सर यांनी आव्हान केले आहे.