नगरमध्ये एथर ४५० चे २०२५ मॉडेलच्या इलेक्ट्रिकल स्कूटरचे अनावरण.

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- इलेक्ट्रिक स्कूटर एथर ४५० चे २०२५ मॉडेलच्या स्कूटर चे अनावरण शोरूमचे संचालक गिरधरीलाल नय्यर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्राहक तथा संचालिका शिल्पा नय्यर तसेच प्रमोद ठुबे, संदीप बोरुडे, हर्ष ओबेरॉय, मोसिन मिर्झा, भूषण ओस्तवाल, टाटा AIG चे गणेश लोंढे, बजाज फायनान्स चे रोहन करमाळे, L&T फायनान्सचे राकेश चोरडिया आदी उपस्थित होते.
एथर ने ग्राहकांसाठी एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. एथर ने ४५० सिरीज या सर्वात जुन्या आणि सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरचे २०२५ मॉडेल लाँच केले आहे. या स्कूटरमध्ये नवीन फीचर्स आणि ड्रायव्हिंग रेंज आहे. ४५० सिरीज स्कूटरमध्ये अनेक नवीन फीचर्सचा समावेश आहे. या स्कूटर ३ मोड मध्ये ऑफर केली आहे. यामध्ये रेन, रोड आणि रॅली. हे मोड वेगवेगळ्या सीच्यूएशनमध्ये वर्क करतात. तसेच हे मोड स्कूटरला वेगवेगळ्या पद्धतीने कंट्रोल देखील करतात. ही स्कटूर लाँच होताच कंपनीने याचे बुकिंग सुरू केले आहे.
इलेक्ट्रिक स्कूटर, ४५० सिरीजच्या हार्डवेअरमध्येही बदल करण्यात आले आहेत. ४५० सिरीज मध्ये नवीन टायर बसवले आहेत, या टायर्सचे नाव MRF Zapper Ne-Tred आहे. एथरचा दावा आहे की ह्या टायर्समुळे स्कूटरची रेंज मध्ये वाढ झाली आहे. या मध्ये २.९kWh प्रकारची रेंज ११५ किमी वरून १२३ किमीपर्यंत तर ३.७kWh प्रकारची रेंज १६१ किमीपर्यंत वाढली आहे.