शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

चर्चेचा विषय गुलदस्त्यात 

मुंबई : 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व अध्यक्ष शरद पवार यांनी आज संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतलीय.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या‘वर्षा’ बंगल्यावर ही भेट होणार आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शरद पवार यांनी अनेकवेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.  राज्यातील राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये नियमित बैठक होते.  गेल्या वेळी विधान परिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी दोघांमध्ये बैठक झाली होती.

विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांची यादी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी सादर केली होती.  मात्र, राज्यपालांकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.  त्यामुळे या विषयावरदेखील मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.