लष्कराने बंद केलेला न्यायालयासमोरील रस्ता चालू करण्यात यावा

माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक

नगर (प्रतिनिधी)- नवीन न्यायालय ते कॉन्व्हेंट शाळा व न्यायालया ते महेश थेटर हा रस्ता अनेक वर्षापासून लष्कराने बंद केलेला आहे तो खुला करण्याच्या मागणीसाठी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक यांनी जिल्हाधिकारी  व खासदार निलेश लंके व आमदार संग्राम जगताप यांना निवेदन देण्यात आले
तसेच खासदार निलेश लंके यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हंटले आहे की, नवीन न्यायालय ते महेश थिएटर समोरचा रस्ता बंद करण्यात आलेला आहे तरी या रस्त्यावरून शाळकरी व कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी या त्यांच्या महाविद्यालयाला जाण्यास वापरत होते परंतु लष्कराने हा रस्ता बंद केला तसेच नवीन न्यायालय ते कॉन्व्हेंट शाळा या या रस्त्यावरून इतर शाळेमध्ये पण विद्यार्थी जातात व भिंगार वरून ही नगर शहरात येणारी वाहतूक जास्त प्रमाणात होती सदर रस्त्यावर मुकुंद नगर, भिंगार, बुरानगर परिसरातील व इतर गावातील विद्यार्थी व सामान्य नागरिक पर्यायी रस्ता म्हणून वापरत होते. लष्कराने हा रस्ता बंद केल्याने जाणे येण्यासाठी त्यांना डीएसपी चौकातून जावं लागत आहे. अवजड वाहतूक व ट्रॉपिक असल्याने जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागत आहे. या रस्त्यावर दररोज लहान-मोठे अपघात घडत असून त्यामुळे लष्कराने बंद केलेला रस्ता चालू करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.