शिक्षण विभागाकडून, अहमदनगर जिल्ह्यातील शाळांची पाहणी

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विशेष अभियान

अहमदनगर : शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विशेष अभियान हाती घेतले. १ ऑगस्टपासून ही पाहणी सुरू करण्यात आली आहे. यात शाळांची झाडाझडती घेतली जाणार आहे. विभागाने दिशा ठरवून दिली आहे. यात झाडाझडती होणार असली, तर गुणवत्तावाढ हाच यामागे उद्देश आहे. अभियानादरम्यान पहिल्या
२० दिवसांत प्रत्यक्ष भेटी करायच्या आहेत. त्यानंतर शाळांनी उपाययोजना करणे अपेक्षित आहे. पुढील आठवड्यात सूचनांचे पालन केले की नाही, हे तपासले जाणार आहे. शेवटच्या चार दिवसांत अनुपालन केले की नाही, याची खात्री केली जाईल. प्रत्येक आठवड्यातील सोमवारी व शुक्रवारी कार्यालयीन कामकाजासाठी आहेत. शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देणे अपेक्षित आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा भेटी करून निरीक्षण अहवाल लॉगिनमधून दररोज अद्ययावत करण्याचे निर्देश आहेत. विकास महाअभियान असे त्यास नाव देण्यात आले आहे. ते ३१ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अभियानात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शाळांचे निरीक्षण करायचे आहे. या निरीक्षणात कोणत्या त्रुटी आहेत, हे तपासले जाणार आहे. अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त शाळांना भेटी देणे अपेक्षित आहे.या तपासणीत विद्यार्थ्यांना गणवेश, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत मिळणारे भोजन, त्याचा दर्जा,वर्ग खोल्याची,स्वच्छतागृहाची आणि शाळेच्या एकूण परिसराची स्वच्छता अध्यापन साहित्य, इलर्निंगची सुविधा अशा महत्वपूर्ण बाबीवर लक्ष दिले जाणार आहे.