सुजय‌ विखेंचं पंतप्रधानांना दिवाळीचे खास  गिफ्ट

'साई ब्लेसिंग बॉक्स' पाठवला

शिर्डी :

साईभक्तांना तसंच आपल्या आप्तेष्टांना साईबाबांचे‌ आशिर्वाद घरबसल्या मिळावे यासाठी शिर्डीत साई ब्लेसिंग बॉक्सची‌ संकल्पना राबवण्यात‌ आली आहे. भाजपचे खासदार ‌सुजय‌ यांच्या‌ हस्ते ‌या ऑनलाइन साई ब्लेसिंग बॉक्सचे‌‌ उद्घाटन करण्यात आलं.
यावेळी खासदार सुजय‌ विखेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे तसंच‌‌ देशातील सर्व खासदार आणि राज्यातील सर्व आमदारांना साई ब्लेसिंग बॉक्स दिपावलीच्या शुभेच्छा म्हणून पाठवले आहेत.
 
साई मंदिर 17 मार्चपासून बंद असल्याने भाविक शिर्डीला येऊ शकत नाहीत. असंख्य भाविक मंदिर खुले करण्याची वाट बघत आहेत. पण या जीवघेण्या कोरोना संकटात साईबाबांचे आशिर्वाद मिळावेत या‌ ‌संकल्पनेतून शिर्डीचे प्रसिद्ध चित्रकार हेमंत यांनी ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून घरपोच साई ब्लेसिंग बॉक्सची संकल्पना राबवली आहे. 
 
स्वत:सह मित्र, आप्तेष्ट नातेवाईक यांना‌देखील हे बॉक्स पाठवण्याची सुविधा याद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.