अभिनेता विजय राजची ‘शेरनी’ चित्रपटातून हकालपट्टी

छेडछाड प्रकरण महागात

मुंबई :   
 
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विजय राज याला आगामी चित्रपट ‘शेरनी’ या  चित्रपटामधून  बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ‘शेरनी’ चित्रपटाच्या सेटवर एका क्रू-मेंबरची छेड काढल्याचा आरोप विजय राजवर करण्यात आला होता.

 
 याप्रकारानंतर गोंदियातून विजयला अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही वेळातच त्याचा जामीन मंजूर झाला होता. मात्र, हे प्रकरण आता विजय राजला चांगलेच महागात पडले आहे. ‘शेरनी’च्या निर्मात्याने या चित्रपटातून विजय राजची हकालपट्टी केल्याचे कळते आहे. 
  
विजय राजच्या या प्रकरणानंतर चित्रपटाची बदनामी नको व्हायला, असे कारण देत निर्मात्यांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवल्याचे कळते आहे. निर्मात्यांना चित्रपट तयार होण्यापूर्वी कुठलेही वाद निर्माण करायचे नाहीत. म्हणूनच इतके कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. तसे, आता त्याच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याची वर्णी लागणार असल्याचे देखील म्हटले जात आहे.