श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम”

नगर – महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये एक जानेवारी 2025 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याचा विकास करणे या तंत्रज्ञानाच्या युगात पुस्तक वाचण्याची आवड निर्माण करून ज्ञानात भर घालणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने  महाविद्यालयात 4 जानेवारी रोजी ग्रंथ प्रदर्शन व सामूहिक वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा.डॉ,मुळे बी.एम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाच्या वाढी करिता 13 जानेवारी रोजी निबंध व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला , कला शाखा विद्यार्थिनी कावेरी जाधव हिने प्रथम क्रमांक , गीता वाघ हिने द्वितीय क्रमांक व हर्षद बारसे याने तृतीय क्रमांक मिळविला यावेळी मराठी विभाग प्रा. डॉ. वर्षा कीर्तने तसेच वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. धनश्री दिवटे या परीक्षक म्हणून लाभल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा वर्षा कीर्तने यांनी मुलांना पुस्तक वाचण्याचे फायदे सांगत आधीकाधिक पुस्तके वाचनाचे आवाहन  केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. सागर कोहक प्रा. प्रियांका ताठे प्रा. प्रीती प्रभुणे प्रा.सीओना आगळे ग्रंथपाल अश्विनी दळवी व सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास प्राध्यापक प्राध्यापकेतर व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.