नवी पेठ येथील श्रीराम मंदिरात सामूहिक शंखनाद आणि घंटानाद कार्यक्रमाने श्रीराम लल्ला वर्षपूर्ती सोहळा संपन्न
नगर- अयोध्या येथील श्री राम लल्ला मंदिरास वर्षपूर्ती झाल्या निमित्ताने नवी पेठ येथील श्रीराम मंदिरात श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्ट वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त मंदिरास फुलाची आकर्षक सजावट तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आले. पाच दिवसापासून रोज वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक शं खनादाने करण्यात आली. या शंखनादाने व घंटानादाने संपूर्ण परिसरात एक प्रसन्न असे वातावरण तयार झाले होते. यावेळी अनेक भजन श्री रामाचे अनेक धार्मिक भजन सादर करण्यात आले या शंखनाद व घंटानाद आणि भजन संध्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी भजन संध्या मध्ये प्रभू श्रीराम आये है…’ रामजी की निकली सवारी….’ श्री राम जानकी…, ये चमक… ये धमक..,’ असे अनेक धार्मिक गीते सादर करण्यात आली. सर्व भाविक भक्त राजस्थानी पगडी आणि पांढरा कुर्ता भगवा पंचा परिधान केल्यामुळे आणखीनच कार्यक्रमात रंगत दिसून येत होती.
नवी पेठ येथील श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टच्या वतीने श्रीराम लल्ला प्रतिष्ठा द्वादशी सोहळ्यानिमित्त मंगळवार दि.७ रोजी अखंड २४ तास ॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥ या तारक मंत्राचे नामस्मरणरुपी संगीत अनुष्ठान संपन्न संपन्न झाले या जपात भाविक भक्ती भवानी तल्लीन झाले. बुधवार दि.८ रोजी भक्तीरंग प्रस्तुत रामायणाचार्य श्री. गोरक्षनाथजी दुतारे महाराज (मुंबई दुरदर्शन कलाकार) ह्यांची श्रीराम भजन सेवा (भजन संध्या) कार्यक्रम घेण्यात आला. गुरुवार दि. ९ रोजी प.पु. स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य पं. श्री.गिरीराजजी व्यास (पुणे निवासी) यांचे सुमधुर वाणीत श्री संगीतमय सुंदरकांड (भक्तीमय संगीत कार्यक्रम) भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शुक्रवार दि. १० रोजी सुप्रसिध्द पं. राजेंद्र शर्मा (रामवाला) – सुप्रसिध्द गायक सी.ए. सागर शर्मा (नागपुर निवासी) ह्यांचा श्रीराम – हनुमान महिमा वर आधारित *॥ एक शाम प्रभु श्रीराम के नाम ॥* हा कार्यक्रम अतिशय भक्तीमय वातावरणात पार पडला.
शनिवार दि.११ रोजी श्रीरामलल्ला प्रतिष्ठा व्दादशी सोहळ्यानिमीत्त सामुहिक महा हनुमान चालिसा पठण व महाआरती दरम्यान सामुहिक भव्य शंखनाद व घंटानाद कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आणि भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच संध्याकाळी महाआरती व ढोलपथकाचे स्थीर वादन झाले. प्रत्येक कार्यक्रमानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले.
अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये भाविकांच्या उपस्थितीत हा प्रतिष्ठा द्वादशी सोहळा संपन्न झाला हा सोहळा यशस्वीतेसाठी श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्ट अध्यक्ष प्रितम मुथ्था , उपाध्यक्ष निखिलजी शेटीया सर्व ट्रस्टी व सेवेकरीं नी मिळून मिसळून सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.