बुधवारी शहरात रंगणार दृष्टीहीन गायकांचा दिल से सारेगामापा
दृष्टीहीन गायकांना प्रोत्साहन व अर्थसहाय्य करण्यासाठीचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- दृष्टीहीन गायकांना मंच उपलब्ध करुन त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी धनश्री वेस्टर्न म्युझिक व इव्हेंट कंपनी आणि इंडियन आयडॉल फेम गायक हेमंत सिंग राठोर यांच्या संकल्पनेतून शहरात बुधवारी (दि.4 डिसेंबर) दिल से सारेगामापाचे आयोजन करण्यात आले आहे. दृष्टीहीन कलाकारांची संगीत मैफल रंगणार असून, या समाजसेवी कार्यक्रमासाठी आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवारी नवीन टिळक रोड येथील नंदनवन लॉन्स मध्ये संध्याकाळी 6 वाजता दिल से सारेगामापा कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. या संगीत मैफलमध्ये इंडियन आयडॉल फेम गायिका अंजली गायकवाड, बॉलीवूडचे सुप्रसिद्ध पार्श्वगायक साईराम अय्यर, अभिनेत्री व निर्माती सारा दुर्गा, मॉडेल प्रसाद बोगावत उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमासाठी प्रवेशिकाच्या माध्यमातून दृष्टीहीन गायकांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या कार्यक्रमास आर्थिक देणगी देऊ इच्छिणाऱ्यांनी 9116636698, 9561253778 व 7447647897 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.