सामाजिक भावना ठेवून समाजाने अनाथांसाठी आधार देणे महत्वाचे आहे – मा. राणीताई लंके

अहमदनगर, दिनांक  २०   डिसेंबर २०२०
समाजाने वाळीत टाकलेल्या दुर्लक्षित घटकातील व्यक्तींना एकत्र आणणे महत्वाचे आहे. सामाजिक भावना ठेवून समाजाने अनाथांसाठी आधार देणे आवश्यक आहे. यादृष्टीने  अनाथ निराधार  जोडप्यांचे सामुदायिक  विवाह  वैष्णवी माता देवस्थान ट्रस्ट मंगल कार्यालयात  आयोजित करून स्नेहालयाने एक सामाजिक विकासाला प्रेरणा देणारी क्रांतिकारक कृती केली असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन मंडळ सदस्या मा, राणीताई लंके यांनी केले.
एच.आय.व्ही./एड्स सप्ताहनिमित्त स्नेहालय संस्था व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर   मा. ज्योती देवरे (तहसीलदार, पारनेर), मा. काशिनाथ दाते (सभापती, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर), मा.  अँड. ज्योती भोसले (माजी महापौर, मालेगाव) मा. घनश्याम बाळप (पोलीस निरीक्षक, पारनेर पोलीस स्टेशन), मा. मोहन बोरसे (पोलीस निरीक्षक, एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन), मा. रामदास टांगळ (अध्यक्ष, वैष्णवी माता देवस्थान मंगल कार्यालय), मा. शरद राधाकिसन महापुरे  (सामाजिक कार्यकर्ते), मा. बबुशा श्रीपती शिवले  (सामाजिक कार्यकर्ते),   अँड. श्याम असावा (प्रकल्प संचालक, स्नेहाधार ) डॉ. प्रकाश शेठ (मार्गदर्शक प्रकल्प, स्नेहाधार), मा. प्रमोद साठे (युवानेते, हंगा) मा. हनीफ शेख, (अध्यक्ष, बाल कल्याण सामिती, अहमदनगर)  मा. प्रवीण मुत्याल (बाल कल्याण समिती, अहमदनगर),  स्नेहालयाचे  पालक मिलिंद कुलकर्णी,  सुवालाल शिंगवी, अध्यक्ष संजय गुगळे, सचिव राजीव गुजर,  विश्वस्त जयाताई जोगदंड, संजय बंदिष्टी, राजेंद्र शुक्रे, मा. अनंत  कुलकर्णी,  स्नेहालयाचे  सहसंचालक अनिल गावडे आदी या सोहळ्यात आप्त म्हणून उपस्थित होते. मा. लंके यांनी  नव दाम्प्यत्यांना आशीर्वाद देतांना योग्य ती आहार, उपचार व  काळजी घेण्याचे आवाहन केले. स्नेहालयानी अलौकिक व अनोख्या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले.
अनाथ – निराधार व्यक्तींसाठी  २२ नोव्हेंबर २०२०  रोजी नवी उमेद – नवी जीवन – नवी आशा याकरिता सहजीवनाची ओढ असणाऱ्यांसाठी  ऑनलाईन राज्यस्तरीय वधू – वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात  १५० पेक्षा जास्त वधू – वरांनी आपली नाव नोंदणी केली होती. एकूण ८  वधू – वरांनी आपले जीवन साथी निवडले त्यापैकी ४  नवे दाम्प्यत्यांचे मोठ्या दिमाखात  विवाह सोहळा पार पडला. या  विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेले वधू – वर  सातारा,  औरंगाबाद  नगर  जिल्ह्यातील तर श्रोगोंदा आणि पाथर्डी आदी तालुक्यातील होते. सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी वधू – वरांचे आप्त उपस्थित नव्हते परंतु सामाजिक जाणीव असणारे अनंत कुलकर्णी,  एम.आय.डी.सी. येथील उद्योगपती मा. रामदास टांगळ,  स्नेहालय परिवार आणि इतर संवेदनशील नागरिक यांनी ही कमी भरून काढली. वधुंचे कन्यादान  मा. राणीताई लंके, मा. ज्योती देवरे, मा. शरद राधाकिशन महापुरे, मा. काशिनाथ दाते, मा. बबुशा श्रीपती शिवले, मा. मोहन बोरसे, मा. घनश्याम बाळप, पुणे येथील शेठ परिवार  यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी वधू – वरांना शुभाशिर्वाद दिले. प्रस्ताविकतेत   जागतिक  एच. आय. व्ही./एड्स  सप्ताह निमित्त दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येते, असे स्नेहालयाचे वरिष्ठ सह संचालक अनिल गावडे  यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जागतिक  एच. आय. व्ही./एडस सप्ताह निमित्त १  डिसेंबर ते  १५  डिसेंबर २०२०   दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या सामुदायिक विवाह सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने  मा.  अँड. ज्योती भोसले (माजी महापौर, मालेगाव) मा. घनश्याम बाळप (पोलीस निरीक्षक, पारनेर पोलीस स्टेशन), मा. मोहन बोरसे (पोलीस निरीक्षक, एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन), मा. रामदास टांगळ (अध्यक्ष, वैष्णवी माता देवस्थान मंगल कार्यालय), मा. शरद राधाकिसन महापुरे  (सामाजिक कार्यकर्ते), मा. बबुशा श्रीपती शिवले  (सामाजिक कार्यकर्ते),  असे अनेक दान दात्यांनी वधू वरांसाठी संसारोपयोगी विविध वस्तू देणगी दिलीत.
सामुदायिक विवाह कार्यक्रमाचे सूत्र संचालन वैजनाथ लोहार यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिन ढोरमले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरत कुलकर्णी, सागर फुलारी, कावेरी रोहकले, विजय गायकवाड, कालिदास खेडकर, विष्णू कांबळे, अशोक अकोलकर, राहुल संत, आणि बालभवन टीम आदींनी परिश्रम घेतले.