अखंड पद्मशाली समाजाचा महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप याना पाठिंबा …

विकासात्मक व्हिजनला जनतेचा कौल....

नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना शहरातील अखंड पद्मशाली समाजातील बांधव व महिलांनी एकमुखी पाठिंबा दिला. गांधी मैदान येथील एका कार्यक्रमात पद्मशाली समाजाच्या वतीने पाठिंब्याची घोषणा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव व महिला वर्ग उपस्थित होत्या.
आ. संग्राम जगताप यांनी शहर विकासात्मक दिशेने जात असताना व्हिजन 2029 साठी पद्मशाली समाजाची साथ असणे आवश्‍यक आहे. विकासाच्या कामात प्रत्येक समाज घटकाची मोलाची साथ गरजेची असून, सर्व समाजाला बरोबर घेऊन विकासात्मक दिशेने वाटचाल राहणार आहे. पद्मशाली समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मार्कंडेय   मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपण हातभार लावू आणि मंदिराचे काम पूर्णत्वास नेऊ. समाजाच्या उत्कर्षासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. समाजबांधवांनी विकासाला संपूर्ण समाजाचा पाठिंबा असल्याचे घोषित केले.