जयपुर मध्ये 105 गावातल्या महिलांनी सोलर पॅनल निर्मिती आणि विक्रीचे घेतले प्रशिक्षण

देशातल्या 105 गावांमध्ये 132 महिलांनी एका वर्षापेक्षा कमी कालावधीत 6,600 घरे प्रकाशमान केली. या महिलांच्या माध्यमातून ज्या घरांमध्ये सरकार वीज देऊ शकत नाही, या घरांमध्ये सौर दिवा पोहोचला आहे. सौर पॅनल बसवण्याच प्रशिक्षण घेण्यासाठी या महिलांनी आपलं कुटुंब सोडून राजस्थानमधील किशनगड गाठले. या ठिकाणी त्यांनी सोलार पॅनल बसवण्याबरोबर सोलर पॅनल बनवणं दुरुस्ती आणि विक्री करण्याचे अनेक महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. ते पूर्ण केल्यानंतर या महिला आपापल्या गावी परतल्या.
त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या भागात लोकांच्या घरात सोलर पॅनल बसवण्यास सुरुवात केली. आणि देशातील अनेक अंधाऱ्या घरांना त्यांनी प्रकाश दिला. सौरऊर्जेचे प्रशिक्षण देणाऱ्या बिंदी इंटरनॅशनल या ना नफा संस्थेच्या संजय मालाकार म्हणाले की, प्रशिक्षणासाठी केवळ अशाच महिलांची निवड केली जाते. ज्यांच्या गावात अनेक महिने वीज नसते. त्यांना पाच महिने सोलर पॅनल बनवण्याचे आणि बसवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. मग एक महिला 2000 ते 4000 प्रकाश देणारे सौर पॅनल बनवू शकते. आणि स्थापित करू शकते. त्यामुळे चार बल्ब आणि एक पंखा चालू शकतो. दुरुस्ती ही या महिला स्वतः करतात. प्रशिक्षण घेतलेल्या 132 महिला पूर्ण क्षमतेने सध्या काम करत आहे.