‘एसटी’ कामगार संघटनांचा आता ३ सप्टेंबरचा अल्टिमेटम

आर्थिक प्रश्नांवर २० ऑगस्टला फायनल मिटिंग

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांवर बुधवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी २० ऑगस्ट रोजी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ९ ऑगस्ट क्रांतिदिनी नियोजित आंदोलन स्थगित करण्यात आले. बैठकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास ३ सप्टेंबरपासून आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही कृती समितीने दिला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत संयुक्त कृती समितीची बैठक बुधवारी मुंबई येथे पार पडली. एसटी कामगारांच्या विविध १३ संघटनांच्या कृती समितीने कामगारांच्या आर्थिक प्रश्नांसाठी ९ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली.
एसटी कामगारांचे वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतके व्हावे, यासाठीचा मसुदा प्रशासन आणि शासनाला दिलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा चालक, वाहक तसेच इतर कॅटेगिरीतील कर्मचाऱ्यांचे वेतन आणि एसटी दोन बैठका, मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतके व्हावे यासाठीचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर करण्याच्या सूचना तातडीने दिल्या आहेत. वित्त विभागाने लगेच दोन बैठका कृती समितीसोबत घेऊन २० ऑगस्टपूर्वी प्रस्ताव सादर केला जाणार आहे. या प्रश्नांवर २० ऑगस्ट रोजी संयुक्त कृती समिती समवेत बैठक घेऊन निर्णायक तोडगा काढण्याचे वचन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
यासंदर्भात त्यांनी वित्त विभागाला सूचना देताना कृती समिती समवेत तातडीने दोन बैठका घेण्याच्या सूचना दिल्या.कर्मचाऱ्यांचे वेतन यातील तफावत दूर करावी. सन २०१६ पासून शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ देण्यात यावी, अशी मागणी कृती समितीने यावेळी केली. शासनाने एसटीला आर्थिक मदत करावी आणि वेतनाची संपूर्ण जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी विनंतीही कृती समितीने केली, असल्याची माहिती देण्यात आली.