श्री.राधाकृष्ण गमे यांना जिल्हा रुग्णालय ६ नोव्हेंबर २०२१ रोजी लागलेल्या आगी संदर्भात दिले निवेदन

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर

               वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण वतीने जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक परिक्षेत्राचे विभागीय आयुक्त श्री.राधाकृष्ण गमे यांना जिल्हा रुग्णालय ६ नोव्हेंबर २०२१ रोजी लागलेली आगी संदर्भात समक्ष भेटून निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा महासचिव योगेश साठे,जिल्हा सल्लागार जीवन पारधे,शहर अध्यक्ष संजय जगताप,शहर सदस्य अमर निर्भवणे,शहर जिल्हा कार्याध्यक्ष भाऊ साळवे, वाहतूक शाखेचे मनोज साळवे, मनोज कर्डिले यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

      अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत जिल्हाधिकारी यांचे म्हणणे नुसार फायर ऑडिट झालं आहे त्यासाठी अडीच कोटी रुपये निधी देण्यात आला होता तर ते अडीच कोटी रुपये गेले कुठे? याची चौकशी झाली पाहिजे. या मागणी सह नेवासा तालुक्यातील वयस्कर आजी त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या नवऱ्याला उपचाराकामी जिल्हा रुग्णालयात आय सी यू मध्ये दाखल केलेले होते जिल्हा रुग्णालयास लागलेल्या आगीत यांचा होरपळून मृत्यू झाला काहीच दिसत नव्हत.त्यावेळी डॉक्टर्स व नर्स स्टाफ मदतीसाठी कोणाला तरी बोलवायला गेले  असतील,बाहेर आरडाओरड करून लोक जमा करत असतील.

 

 

 

 

मग पोलिस अधीक्षकांनी कोणती सीसीटीव्ही फुटेज तपासून बघून गुन्हे दाखल केले? कोणाच्या दबावाखाली व वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत? राष्ट्रीय ग्रामीण अभियाना अंतर्गत जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना २०२०-२०२१ कामाचे आदेश दिले आहेत का?
सदर स्टाफ नर्स राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेनुसार ११ महिन्यासाठी घेण्यात आलेल्या आहेत.त्यांचे करारनामे व ऑर्डर तपासणी करावी.तसेच पाहणी करून दोषींवर कारवाई करावी. सदर घटना घडली त्यावेळी अहमदनगर जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुनील पोखरणा हे कुठे होते? याचे सीसीटीव्ही फुटेज मार्फत तपासून घेण्यात यावे.

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राइब करा. 

 

 

अहमदनगर जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुनील पोखरणा यांची नेमणूक झाल्यापासून सर्व मेडिकल मेडीसिन खरेदी ,जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेले बांधकाम उप अभियंता ,जिल्हा शल्य चिकीत्सक व मनपा अग्निशमन अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर ३०४(अ),३०८,३३८ याप्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

 

 

यासर्व मागणी लवकरात लवकर संबंधितावर कारवाई व्हावी व पीडितांना न्याय मिळावा व सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत लवकरात लवकर त्यांना द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी अहमदनगर तर्फे करण्यात आली आहे.केलेल्या मागण्या वेळेत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.