नगर मनपातील कामगार युनियन चे आयुक्तांना निवेदन
अहमदनगर :
अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियन तर्फे कामगारांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी श्रमिक युनियनने संयुक्त बैठकीचे मागणी करून या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली होती, मात्र अजूनही यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.
याचसंदर्भात अनेक मागण्या निवेदनातून मांडत आज अहमनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना मागणीचे निवेदन देण्यात आलं आहे. यावेळी महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा फरक एक रकमी अदा करण्यात यावा, वैद्यकीय खर्चासाठी कर्मचाऱ्यांची सर्व थकीत बिले अदा करण्यात यावीत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुधारित कुटुंब वेतन व पेन्शन योजना लागू केलेल्या फरकाची एक रकमी किंमत द्यावी , अश्या एक ना अनेक मागण्या या निवेदनाद्वारे आयुक्तांना करण्यात आल्यात.
आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची सर्व जबाबदारी महानगर पालिकेवर राहील, असा इशारा कामगार युनियन तर्फे देण्यात आलाय.