नगरचा सायकलपटू एका वर्षात दोनदा ” एस आर “चा मानकरी

अनेक विश्व विक्रम त्यांच्या नावावर

अहमदनगर

 

                                 एका वर्षभरात 200 किमी, 300 किमी ,400 किमी व तब्बल 600 किमी असे चारही सायकलिंग इव्हेंट करणारे  अहमदनगर सायकलिंग असोसिएशन चे ज्येष्ठ सदस्य शरद काळे पाटील हे ह्या वर्षात दोनदा एस आर Super Randoneeur  होण्याचे मानकरी ठरले आहेत. Audex India तर्फे वेगवेगळ्या Brevet आयोजित केल्या जातात ज्या मध्ये सायकलिस्ट भाग घेतात. 200 किमी , 300 किमी , 400 किमी   व 600 किमी सायकलिंग  ठराविक वेळेत पूर्ण करावयाची असते. एका वर्षात जो सायकलिस्त ह्या चारही राईड पूर्ण करतो त्यास सुपर रांडोनेऊर  SR असे संबोधले जाते. काळे पाटील हे सन 2018-19 व 2019-20 ह्या दोन्ही वर्षात एस आर झाले  तर  2020-21 ह्या वर्षात दोनदा एस आर होण्याचा  मान  त्यांनी पटकावला आहे.

 

 

 

 

 

                           काळे पाटील हे उत्कृष्ट मोटार सायकलपटू देखील आहेत. अनेक विश्व विक्रम त्यांच्या नावावर आहेत. संपूर्ण अष्टाविनायक यात्रा मोटार सायकलवर त्यांनी 12 तास 12 मिनिटात पूर्ण केली त्यामुळे त्यांचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहे. तसेच भारताचा सुवर्ण चतुष्कोन मुंबई – दिल्ली- कलकत्ता- मद्रास व परत मुंबई असे एकूण 6000 किमी अंतर त्यांनी 88 तासात पूर्ण केले आहे. त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. राज्यातील सर्वात अवघड समजली जाणारी सह्याद्री क्लासिक ह्या सायकलिंग स्पर्धेत त्यांनी भाग घेतला असून ती दोनदा पूर्ण केली आहे.

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

                         एक महिन्यापूर्वी  नगर मधून 20 सायकालिस्त ना बरोबर घेऊन त्यांनी पंढरपूर यात्रा 24 तासात पूर्ण केली होती. असे अनेक विक्रम काळे पाटील यांच्या नावावर आहेत.
                            काळे पाटील यांनी सायकलिंग क्षेत्रात सुद्धा भरारी घेतली आहे. ते उत्कृष्ट मोटार सायकलपटू तर आहेतच . तसेच ते अल्ट्रा मॅरेथॉन पटू देखील आहेत.
                            त्यांच्या ह्या यशाबद्दल  मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील , आ. अरुण काका जगताप, महापालिकेचे आयुक्त श्री शंकर गोरे व उपआयुक्त  यशवंत डांगे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.