वॉल क्लायंबिंग खेळाडू हृतिक मारणेला ७५ हजाराची मदत

राहुल नरूटे व मंदार निरगुडेंनी दिला धनादेश

                                     बाणेर येथील हाऊस ऑफ़ मीटचे संचालक  राहुल नरूटे आणि मंदार निरगुडे यांच्या वतीने वर्ल्ड कपसाठी  वॉल क्लायंबिग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हृतिक मारणे यांना ७५ हजाराचा धनादेश देवून मदतीचा हात दिला. यावेळी भूगावचे माजी सरपंच बाळासाहेब शेडगे,प्रशिक्षक अमोल जोगदंड,हाउस ऑफ़ मीटचे संचालक राहुल नरुटे,मंदार निरगुडे आदी उपस्थित होते. याबाबतीत श्री.नरुटे म्हणाले कि, आपण आपला व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी जपत गरजू गरीब खेळाडूंना मदत केली पाहिजेत. खेळाडू हे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे नाव उंचावत असतात. अशा खेळाडूंना मदत करणे म्हणजेच एक प्रकारची देशसेवाच आहे . देशाचे नाव जगात झळकवणाऱ्या खेळाडूस मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे.

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

 

                    हृतिक मारणे सारख्या गरीब आणि होतकरू खेळाडूला मदत करणे हे  माझ्यासाठी  देशसेवाच आहे.  खेळाडू ह्रितिक म्हणाले कि, स्पोर्ट( वॉल)  क्लायंबिंग खेळाडू ह्रितिक मारणे म्हणाले कि, ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्यासाठी १२ वर्ल्डकप आणि एक चॅंपियनशिप मध्ये सहभागी होवून रॅंकिंगचा उचांक टिकवून ठेवावा  लागतो . मात्र माझ्या कमकुवत आर्थिक स्थितीमुळे गेल्या वर्षी ७ वर्ल्ड कप व एक चॅंपियनशिप स्पर्धेत सहभागी होता आले. ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. नरुटे साहेबांसारख्या दानशूर व्यक्तीकडून आर्थिक मदत झाल्यास नक्कीच भारताला पदक मिळवून देइन. असा विश्वास व्यक्त केला.  २०२२  साली  चायनात होणाऱ्या एशियन गेम्स आणि 2024 ला पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक साठी कसून तयारी करीत आहे.