ऋषिकेश राऊत
गेल्या ७ दिवसांपासून अहमदनगर शहरामध्ये जोरदार पाऊस चालू आहे. या पावसामुळे नगरच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यात आणखी भर म्हणजे पालिकेने पाईप लाईन टाकण्याच्या नावाखाली नगरचे रस्ते जणू जे सी बी च्या साहाय्याने नांगरण्यात आलेले आहेत. त्यातच बाजारपेठेत ड्रेनेज फुटून खोल खड्डा पडला होता.