प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य नसेल तर महिलांनी काम कसे करायचे ?

भाजप महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी थोरात यांचा सवाल

प्रतिनिधी (वैष्णवी घोडके)

 

 

                                  पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी  स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून “मी आत्महत्या करतेय”  असे सांगणारी एक ऑडिओ क्लिप बनवली. ही क्लिप सर्वत्र व्हायरल झालीय.  या व्हायरल क्लिप विषयी जनमाणसातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नगरच्या भाजप च्या महिला आघडीच्या वतीने, या प्रकरणाला पाठिंबा दर्शवला आहे. महिलांवर असे अत्याचार होत असतील तर  उच्चशिक्षित महिलांनी काय करायचं? असा सवाल भाजप महिला आघाडीच्या अश्विनी थोरात यांनी केलाय.

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा.

 

 

                                       महिलांना प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य नसेल तर महिलांनी काम कसे करायचे असेही त्या म्हणाल्यात.  या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी महिला भाजपच्या वतीने करण्यात आलीय. या बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. यावेळी भाजप महिला आघाडीच्या अंजली वल्लाकट्टी, प्रिया जानवे, अनुजा गायकवाड, रेश्मा शेख, जोकारे, विद्या धिंडे, संध्या पावसे, रेखा मैड, अर्चना चौधरी, अश्विनी थोरात, सुरेखा विद्ये, ज्योती दांडगे, सुजाता औटी, नंदा चाबुकस्वार आदी उपस्थित होत्या.