मराठा आरक्षणाचा विषय आता पुन्हा लांबणीवर का बरे ? तर खालील माहिती वाचा …

ठाकरे सरकारला दणका 

मुंबई : 

गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.  महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना सरकारच्या वकिलांनी विविध उदाहरणं देऊन अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी केली होती, मात्र ही स्थगिती लगेच  हटवली जाणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. 

आता पुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होणार आहे.  मराठा आरक्षणाचं पुढे काय होणार ही लढाई सुरुच आहे.  अशात आता अंतरिम स्थगिती उठवण्यास घटनापीठाने नकार दिला आहे.  हे प्रकरण गंभीर आहे आणि मोठं आहे त्यामुळे विस्तृत सुनावणी जानेवारी महिन्यात केली जाईल असं या घटनापीठने सांगितलं आहे.  आम्ही कोणतीही भरती थांबवण्यास नकार दिलेला नाही असं कोर्टाने म्हटलं आहे.