तृप्ती देसाईंना पोलिसांनी सुप्यातच अडवले… 

ड्रेस कोडचा बोर्ड हटवण्याची देसाईंची मागणी 

अहमदनगर :
 
साईबाबा संस्थानच्या ड्रेसकोड बाबत भक्तांना आवाहन करणारे फलक लावल्यानंतर या फलकांवरून वातावरण चांगलच तापलंय. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या बोर्ड हटवण्यासाठी शिर्डीला जात असताना त्यांना सुप्यातील टोलनाक्यावर अडवण्यात आल आहे.  शिर्डीपासून १०० किलोमीटर आधीच पोलिसांनी देसाई आणि त्यांच्या कार्यर्त्यांना ताब्यात  घेतलय.  यावेळी पोलीस आणि देसाई यांच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये बरीच बाचाबाची झाली आहे.   आपल्याला अस रोखणे चुकीचे आहे, असे सांगत शिर्डीत जाण्याचा आपला ठाम निर्णय असल्याचा माध्यमांशी बोलताना देसाईंनी सांगितले आहे.  तृप्ती देसाई यांनी संस्थानाने त्वरित बोर्ड हटवावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला होता.  यानंतर आज सकाळपासूनच शिर्डीत बंदोबस्त करण्यात आला होता.  मंदिरात ही फलकांच्या जवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.   ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी देखील तृप्ती देसाई यांना रोखण्याचा इशारा दिल्याने शिर्डीत बंदोबस्त वाढवण्यात आला होता.