आहील्यादेविंच्या चरणी प्राण सोडु पण उपोषणापासुन मागे हटणार नाही – माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले

आठव्या दिवशीही चौंडीतील उपोषण सुरूच

जामखेड ( प्रतिनिधी – नासीर पठाण)

गेल्या आठ दिवसांपासून यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी चौंडी येथे अमरण उपोषण सुरू आहे. या उपोषण स्थळी आज जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी भेट घेतली. मात्र उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने यावर काही तोडगा निघाला नाही त्यामुळे आठव्या दिवशीही उपोषण सुरूच राहीले.

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडीत यशवंत सेनेच्या वतीने उपोषणकर्ते आण्णासाहेब रुपनवर व सुरेश बंडगर हे उपोषणास बसले आहेत. या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. आज अहमदनगरचे जिल्हा अधिकारी सिद्धाराम सालीमठ ; पोलीस अधीक्षक राकेश ओला व माजी मंत्री .आ. प्रा.राम शिंदे यांनी भेट घेऊन सविस्तर मागण्यांवर चर्चा केली. तसेच आपल्या भावना वरीष्ठ पातळीवर पोहचवू असे अश्वासन दिले.

या नंतर उपोषणकर्ते यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की आठ दिवस झाले आमच्या पोटात अण्णचा कन नाही. आठ दिवस होऊनही अहमदनगर जिल्ह्यातील पालकमंत्री उपोषणास्थळी भिरकले नाहीत ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सरकारची जबाबदारी म्हणून कोणी मंत्री देखील या ठिकाणी आले नाहीत. आठ दिवसामध्ये कोणी दखल घेतली नसल्याने उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे .

खुप कायदे नविन येत आहेत पण धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश आजुन झाला नाही. घटनेत अधिकार आहे म्हणून आम्ही आरक्षण मागतोय पण पदरात काहीच पडत नाही. गेल्या सत्तार वर्षांत आम्ही मागणी करतोय पण आजुन आरक्षणाचा तीढा सुटला नाही. धनगर आरक्षणाची अंमलबजावणीची झाल्या शिवाय आहील्यादेविंच्या चरणी प्राण सोडु पण उपोषणापासुन मागे हटणार नाही.

आज अहिल्यादेवी होळकर यांच्या पावन भूमीत चोंडी येथे धनगर आरक्षण साठी आमरण उपोषण साठी सुरवात झाली. यामध्ये माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांगडे (बारामती), आण्णासाहेब रूपनवर (माळशिरस), गोविंद नरवटे (लातुर), सुरेश बंडगर (परभणी) समाधान पाटील (जळगाव), नितीन धायगुडे (नातेपुते), किरण धालपे (इंदापुर), बाळा गायके (बिड) आहील्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे , चौंडी चे सरपंच सुनील उबाळे, चेअरमन विलास जगदाळे, मोहन (मामा) गडदे , संतोष कुरडुले, अजित उबाळे, अजित शिंदे, अतिश शिंदे, अमोल उबाळे, गणेश उबाळे या ग्रामस्थांनी पाठींबा दिला आहे.