अखेर कुख्यात गुंड नरुटे यास हाय कोर्टातून जामीन मंजूर

कुख्यात गुंड संजय नरुटे यास जामीन मंजूर

माळशिरस मधील कुख्यात गुंड संजय नरुटे यास अखेर मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजुर

जामीन मिळाल्यानंतर दोन वर्ष माळशिरस तालुक्यात प्रवेश न करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश.

सोलापुर ( माळशिरज) – माळशिरज तालुक्यातील कुख्यात गुंड संजय नरुटे यास जामीन मंजूर झालं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या महत्वपूर्ण निकालात हा आदेश देण्यात आला आहे. माळशिरस तालुक्यात घडलेल्या एका प्राणघातक हल्ला प्रकरणात त्याच्चयावर गुन्हा दाखल झाला होता. त्यात त्याला जमीन मंजूर झाला आहे. हे प्रकरण खूप गाजले होते. या बहुचर्चित प्राणघातक हल्ल्याप्रकरनी संजय नरुटे ( रा. ता.माळशिरज) व इतर यांचे वर भादवि कलम 307,326,324,452 व 34 तसेच अट्रोसिटी कायदा कलम 3(1) व 3(2)(v) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होते .आरोपीने प्रथम मा. सत्र न्यायाधीश माळशिरज कोर्ट येथे जामीन अर्ज दाखल केला परंतु सत्र न्यायालयाने सदरील अर्ज फेटाळला.

त्याविरोधात आरोपीने मा. मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी ॲड. शैलेश चव्हाण ,ॲड. हर्षवर्धन तांबे ,ॲड.आदेश चव्हाण यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. यावेळी मुळ फिर्यादी, सरकारी वकील व पोलीस यांचा व आरोपींचे वकील यांचा युक्तिवाद एकूण आरोपीचे वकीलॲड. शैलेश चव्हाण ,ॲड. हर्षवर्धन तांबे ,ॲड.आदेश चव्हाण यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रेवती मोहिते – डेरे व गौरी गोडसे साहेब यांनी आरोपीस 25 हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर व माळशिरज तालुक्यात प्रवेश न करण्याच्या अटींवर जामीन अर्ज मंजूर केला. पण त्याला माळशिरस तालुक्यात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.