उत्तर प्रदेशात सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे शंभर हून जास्त लोक मृत्यूमुखी पडले. यापूर्वी धार्मिक ठिकाणी चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या.
विशेष म्हणजे 2008 ते 2013 या पाच वर्षांच्या 29 घटनांपैकी 27 घटना या धार्मिक स्थळाजवळ घडल्या त्यात 500 हून अधिक मृत्युमुखी पडले. तर शेकडो जण जखमी झाल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली होती. महाराष्ट्रातील मांढरदेवी आणि राजस्थानच्या चामुंडा देवी मंदिर परिसरातील चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडणाऱ्या भाविकांची संख्या आतापर्यंतच्या घटनातील सर्वाधिक राहिलेली आहे.
फुलराई मुगल गडी येथे साकार हरीबाबांच्या एक दिवसीय सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. पावणेदोनच्या सुमारास हा सत्संग संपल्यानंतर शेकडो भाविकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडायला सुरुवात केली. यावेळी बाबांच्या सेवादारांनी भाविकांना रोखून धरले होते. ऊन लागत असल्याने अनेक भाविकांनी तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याने चेंगराचेंगरी झाली. या रेटारेटीत अनेक जण बेशुद्ध पडले, तर आग्रा येथून भोले बाबा यांचा सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या एका महिलेची 15 वर्षाची मुलगी बेपत्ता झाली. पोलिसांकडूनही कोणती मदत दिली जात नसल्याचे पीडित महिलेने माध्यमांना सांगितले आहे. रुग्णालय आणि घटनास्थळी देखील मुलगी दिसत नसल्याने तिची आई भयभीत झाली. तसेच बधाई येथील सुरेश हाच सत्संगासाठी आपल्या कुटुंबीयांसह आला होता. मात्र चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भावाची सून सापडत नसल्याचे सुरेश यांनी सांगितले आहे. या चेंगराचेंगरीमुळे अनेकजण बेपत्ता असल्याचे पोलिसांनी आम्हाला सांगितले असून, आम्ही त्यांचा शोध घेत असल्याचा सुरेश म्हणाले. दरम्यान रस्ता खराब असल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे प्रत्यक्षदर्शी शकुंतला नावाच्या महिलेने सांगितले. भोले बाबा यांचा सत्संग सुरू होता. तो संपताच नागरिक तिथून बाहेर पडण्यासाठी घाई करू लागले. मात्र रस्ता चांगला नसल्याने नागरिकांना चालता येत नव्हते. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. आणि एकच गोंधळ उडाला. हाथरस येथील फुलराई गावात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी नवीन माहिती समोर येते त्यानुसार, या ठिकाणी आयोजित असलेल्या सत्संगासाठी राजस्थान, मध्यप्रदेश, हरियाणा यांच्यासह अनेक राज्यातून भाविक आले होते. येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक जमले होते की, त्यांच्या वाहनांची रांग सुमारे तीन किलोमीटर होती. त्यामुळे अशा प्रकारचा अपघात घडला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.