प्रचारावरून एकाला मारहाण
लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरू असताना उमेदवारांचा प्रचार करण्याच्या कारणावरून एकाला मारहाण झाल्याचे घटना घडली याबाबत अरुण परसराम डांगे यांच्या फिर्यादीवरून युवा सेनेचे पदाधिकारी विक्रम राठोड यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला फिर्याद आणि त्यांचे मित्र मतदान सुरू असताना स्टेट बँक चौकातील छावणी कॉम्प्लेक्स च्या गाड्या समोर थांबलेले होते. त्या ठिकाणी विक्रम राठोड आले व उमेदवाराचा प्रचार करण्यावरून वाद घालायला सुरुवात केली. फिर्यादी राठोड याला म्हणाले की आम्ही प्रचार करत नाही त्यानंतर आठवड्याने फिर्यादी यांना थांबवून शिव वेगळा करत चापटीने मारहाण केली तसेच फिर्यादी यांच्या खिशात आईची बाटली टाकल्याचे फिर्यादित म्हटले आहे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात राठोडसह दोघांवर गुन्हा दाखल झाला