श्रीराम जन्म भूमी मंदिर निर्माण न्यासचे राष्ट्रीय महासचिवांचे शहरात स्वागत

श्रीराम जन्म भूमीत राम मंदिराच्या निर्माणाबाबत चर्चा

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

श्रीराम जन्म भूमी मंदिर निर्माण न्यास (अयोध्या) चे राष्ट्रीय महासचिव तथा धुळे महापालिकेचे नगरसेवक प्रदीप नानासाहेब कर्पे यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

 

 

 

 

 

 

 

 

शहरातील सावेडी येथील गायकवाड कॉलनीत लहामगे यांच्या निवासस्थानी कर्पे आले असता, नगरसेवक विलास ताठे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे, नगरसेवक उदय कराळे, नानासाहेब गवळी, सानप, जयंत रसाळ व इतर नागरिक उपस्थित होते.

 

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा.

 

 

यावेळी श्रीराम जन्म भूमीत राम मंदिराच्या निर्माणाबाबत चर्चा करण्यात आली. श्रीराम जन्म भूमी मंदिर निर्माण न्यासचे राष्ट्रीय महासचिव प्रदीप कर्पे यांनी अहमदनगर शहरातून श्री रामभक्तांनी मंदिरासाठी मोठी मदत दिली आहे. लवकरच भव्य मंदिर साकारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.