बाबासाहेब बोडखे या शिक्षकाचे सामाजिक व शैक्षणिक कार्य प्रेरणादायी -आमदार संग्राम जगताप

शिक्षकाने दिली पूरग्रस्तांना अन्न-धान्यासह विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

शिक्षकांमुळे सुसंस्कार समाज घडतो. आजही गुरुप्रमाणे दिशा दाखवणारे शिक्षक समाजात असल्याने मुलांचे उज्वल भवितव्य घडत आहे. विद्यादानचे पवित्र कार्य करत असताना बाबासाहेब बोडखे या शिक्षकाचे सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे. कोरोनाच्या संकटकाळात त्यांनी गोर, गरीब व गरजू घटकांना मदतीचा हात देऊन भरीव मदत केली.  पूराच्या प्रलयाने कोकण भागातील कुटुंब उध्वस्त झाले असताना, आपला वाढदिवस साजरा न करता त्यांनी पूरग्रस्तांसाठी दिलेली मदत संवेदना जागृक करणारी असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

 

कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रात पूराने हाहाकार माजवला असताना आपला वाढदिवस साजरा न करता शिक्षक परिषदेचे नेते व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी त्या पैश्यातून कोकणातील पूरग्रस्तांसाठी अन्न-धान्य व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची मदत आमदार जगताप यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, प्राचार्य भरत बिडवे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, स्वप्निल शिंदे, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, बबन शिंदे, प्रा. झुंबर पालवे, किशोर आहिरे, सोहेल शेख, विराज बाबासाहेब बोडखे, संतोष ढाकणे, वैभव ढाकणे, ओंमकार घोलप आदी उपस्थित होते.

 

 

 

 

 

पुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले की, शिक्षकांच्या न्याय, हक्कासाठी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून संघर्ष करताना बोडखे यांनी नेहमीच समाजातील गोर, गरीब व गरजू घटकांना मदतीचा हात दिला आहे. कोरोनाच्या महामारीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकाचे वाटप केले. निराधार बेवारस मनोरुग्णांचा सांभाळ करणार्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात जाऊन मनोरुग्णांसह दिवाळी साजरी केली. त्यांना अन्न-धान्य, कपडे व मिठाईचे वाटप केले. त्याबरोबरच तपोवन रोडलगत मतिमंद मुलांची शाळा , येथे सर्व  मुलांना कपडे , किराणा व सहा महीने पुरेल इतके धान्य दिले . हातावर पोट असलेल्या कामगारांचा रोजगार हिरावला असताना त्यांना देखील किराणा साहित्याची मदत दिली. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ठिकठिकाणी जाऊन जनजागृती केली. नागरिकांना मास्क , हॅण्डग्लोव्हज् व सॅनीटायझरचे वाटप केले. तसेच कोविड केअर सेंटरला विविध साहित्याची मदत देऊन कोरोना रुग्णांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी व्याख्यान व योगा प्राणायामचे धडे दिले. त्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य स्फुर्ती देणारे व सर्वांसाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा.  बाबासाहेब बोडखे म्हणाले की, कोरोना महामारीच्या संकटकाळात माणूस माणसापासून दुरावत असताना माणुसकीच्या भावनेने कार्य केले. कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रात पूरामुळे आपले बांधव संकटात असताना सामाजिक बांधिलकी म्हणून वाढदिवस साजरा न करता त्यांना मदत दिली आहे. संकटकाळात सण, उत्सव व वाढदिवस साजरे करणे चुकीचे असून, संकटात असलेल्या बांधवांना आधार देण्याची वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.