‘महफिल ए रफी’ ने रसिक झाले मंत्रमुग्ध

मोहम्मद रफिंच्या पुण्यतिथी निमित्त रंगली अवीट गोडीच्या गाण्यांची मैफल

अहमदनगर (वैष्णवी घोडके)
                                मोहम्मद रफीनी गायलेली अवीट गोडीची गाणी, त्याला साजे से संगीत आणि सोबत सुरेल आवाज आणि बहारदार निवेदन. ‘महफिल ए रफी’ या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले. वन्स मोअरच्या मागणीने आणि टाळ्यांच्या कडकडाटाने रसिकांनी सभागृह अक्षरशः डोक्यावर घेतले होते. गोल्डन व्हॉइस ग्रुप ने मोहम्मद रफीच्या  अविस्मरणीय गीतांचा कार्यक्रम  ‘महफिल ए रफी’चे नुकतेच  अहमदनगरमध्ये आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून पार पडला.

 

 

 

                                                कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या  उपस्थितीत सरस्वतीचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड चे व्यवस्थापक इम्रान सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले. बॉलिवूडमध्ये विविध विषयांवरील चित्रपटांना प्रेक्षकांची जितकी पसंती मिळते तितकीच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त पसंती या चित्रपटातील गाण्यांना दिली जाते. हिंदी चित्रपटसृष्टीतील बरीच गाणी विशेषत: मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या काळातील गाणी प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करत आहेत, हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून आले. या कार्यक्रमात मोहम्मद रफी यांच्या सह लता मंगेशकर, किशोरकुमार, आशा भोसले,सुमन कल्याणपूर, शैलेंद्र आदी गायकांनी गायलेली, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आर. डी. बर्मन, ओ. पी. नय्यर,कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेली आणि आनंद बक्षी,मजरुह सुल्तानपुरी, हसरत जयपुरी,साहिर लुधियांनवी, निदा फाजली यांच्या शब्दांनी नटलेली गाणी सादर करण्यात आली.

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा.

 

 

 

                                                        या कार्यक्रमाची सुरुवात सुनील भंडारी यांनी ‘सुख के सब साथी’ या गाण्याने केली. आयोजक समीर खान आणि विनय गुंदेचा यांनी गायलेल्या ‘बने चाहे दुश्मन’ या गाण्यावर रसिकांनी सभागृह डोक्यावर घेतले. किरण उजागरे आणि निता माने यांनी गायलेल्या ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे ‘ या गाण्याला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. प्रतिभा साबळे यांनी गायलेले छुप गये सारे नजारे’ डॉ.अचला दीक्षित  (पुणे)यांनी गायलेले ‘चुरा लिया है तूमने जो दिल को’ तसेच विजय तंनू यांनी गायलेले ‘लाखो है निगाहो मे’ ही गाणी रसिकांची वाहवा मिळवून गेली. रियाज पठाण यांनी आपल्या निवेदनाद्वारे खुमासदार शैलीत मोहम्मद रफीच्या आयुष्यातील किस्से आणि विनोदातून रसिकांना खिळवून ठेवले. कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रसिद्ध किबोर्डीस्ट दिलावर शेख यांनी केले. प्रसिद्ध तबलावादक अजित गुंदेचा यांनी तबला, ढोलक,कोंगो वाजवत तर गौतम गुजर यांनी पॅड वाजवत संगीताची बाजू सांभाळली. दिनेश घेवरे आणि अभिनंदन ढोरे यांनी उत्कृष्ठ ध्वनी संयोजन केले.या कार्यक्रमात अनेक गाण्यांना वन्स मोअर आले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

                                                        गोल्डन व्हॉइस ग्रुप नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून या ग्रुप च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. या ग्रुप च्या वतीने कोविड रुग्णासाठी नुकताच शरदचंद्र पवार आरोग्यमंदिर भाळवणी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आ. निलेश लंके यांनी कौतुक केले तर रसिकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला.