काय आहे अजिंक्य गायकवाडची डेथ मिस्ट्री ????
एम एस ई बी च आहे अंजिक्यच्या मृत्यूस जबाबदार
अहमदनगर (संस्कृती रासने)
केवळ विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या अजिंक्य गायकवाडच्या मृत्यूचे गूढ आता उकलले आहे. त्याचा मृत्यू ११ के व्ही ओव्हर हेड वायरवरून आलेल्या केबल टी व्ही च्या वायरला चिकटून झाल्याचे समजतंय . तेव्हा त्याच्या मृत्यूला विनापरवानगी केबल टाकण्याची मुभा देणारे एम एस ई बी चे अधिकारी आणि केबल चालक जबाबदार आहेत तेव्हा त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि शहरभर विजेच्या खांबावरून पसरलेले अनधिकृत धोकादायक इंटरनेट आणि टी व्ही केबलचे जाळे काढले जावे यासाठी आता जागरूक नागरिक मंच प्रयत्न करणार आहे. मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे हे यासाठी आग्रही आहेत.
हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा
नगर शहरात शेकडो किलोमीटर केबल अशाच प्रकारे धोकादायक पद्धतीने टाकण्यात आलेली आहे. स्थानिक केबल नेटवर्क आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्याचे वायरमन या केबल टाकण्यासाठी एम एस ई बी आणि पथदिव्याचा आधार घेतात . त्यामुळे हा मृत्यूचा सापळा घराघरात पोहोचलेला आहे. या वायरींचे शॉक अनेकांना बसले असतील पण ते किरकोळ किंवा माध्यम स्वरूपाचे असल्याने त्याची फारशी गंभीर दाखल कोणीही घेतली नसावी पण आता हा प्रकार अजिंक्यच्या जीवावरच बेतला मग याची चर्चा सुरु झाली. हा विषय जेव्हा जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांना समजला तेव्हा त्यांनी याची गंभीरता ओळखून या घटनेला सर्वस्वी एम एस ई बी , महानगर पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहेत. तसेच स्थानीक केबल चालक आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या जबाबदार आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी ते पाठपुरावा करणार आहे. हा गुन्हा दाखल होण्याने अजिंक्य परत येणार नाही पण अशा घटनेची पुनरावृत्ती परत होऊ नये आणि शहर भर विजेच्या खांबावरून पसरलेले धोकादायक केबलचे जाळे काढले जाईल आणि अनेकांचे जीव वाचतील हा त्यामागचा उद्देश आहे.