आमचं ठरलंय : भैय्या गंधेच हवेत आम्हाला विरोधी पक्षनेता

भाजप कार्यकर्त्यांची पक्ष श्रेष्ठीकडे एक मुखी मागणी

अहमदनगर (संस्कृती रासने )

 

अहमदनगर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनाच देण्यात यावं अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत तसा ठराव करून तो चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले जाते आहे.  भाजपचे पदाधिकारी ,नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी अशी एकमुखी मागणी पक्ष श्रेष्ठीकडे केली असल्याची माहिती भाजपचे जेष्ठ नेते वसंत लोढा यांनी दिली आहे. गंधे हे पालिकेच्या राजकारणातील सर्व पक्षीय व सर्व मान्य नेतृत्व असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

 

 

               नगर महानगर पालिकेत विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. मागील कार्यकाळात राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता मिळवली होती. पण  भाजपाला या टर्मला त्यांच्याकडे महापौर पदासाठी त्या राखीव गटातील नगरसेवक नसल्यामुळे या निवडणुकीत तटस्थ राहावे लागले. शिवसेनेच्या रोहिणी संजय शेंडगे या बिनविरोध महापौर झाल्या. आणि राष्ट्रवादीचे गणेश भोसले हे बिनविरोध उपमहापौर पदाच्या खुर्चीवर बसले. राष्ट्रवादी आणि  शिवसेना सत्तेत असल्यामुळे आता विरोधी पक्ष नेते पदावर पालिकेत विरोधी पक्ष नेते पदावर भाजपाने आपला दावा सांगितला आहे.  या पदासाठी भाजपमधील अनेकजण इच्छुक आहेत.
पण भाजपचे नगरसेवक महेंद्र भैय्या गंधे यांच्या गळ्यात ही विरोधी पक्षनेतेपदाची माळ पाडावी अशी सर्वांची इच्छा असल्याचे दिसते आहे. वसंत लोढा यांनी  याला दुजोरा दिला आहे

 

 

 

 

 

 

 भाजपाचे नेते माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, जेष्ठ नेते अभय आगरकर, वसंत लोढा , सचिन पारखी या नेत्यांनी गंधे यांचे नाव लावून धरले आहे. सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांना गंधे हे सहज उपलब्ध होतात.  तसेच नगर महानगरपालिकेत सुरु असलेले सोयीचे राजकारण पाहता नागरी समस्या सोडिवण्याकडे सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे पालिकेत सक्षम विरोधी पक्ष नेता असणे आवश्यक आहे. महेंद्र भैय्या गंधे यांच्या रूपाने हे नेतृत्व पालिकेला मिळेल असे सर्वाना वाटत आहे. त्यामुळे सर्वानी त्यांच्या नावाला एकमुखाने संमती दिली आहे. वरतून गंधे यांचेच नाव जाहीर होईल असा विश्वास भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांना वाटतो आहे.