आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या जिल्हा सचिवपदी शरद महापूरे यांची नियुक्ती

दुर्बल घटकांना त्यांचे हक्क मिळण्यासाठी प्रयत्न करणार...

अहमदनगर (संस्कृती रासने )

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या जिल्हा सचिवपदी शरद राधाकिसन महापूरे यांची नियुक्ती करण्यात आली. मानव अधिकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष रविराज साबळे व जिल्हा चेअरमन प्रा. पंकज लोखंडे यांच्या हस्ते महापूरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राज्य सदस्य विशाल डांगे, पुणे जिल्हा व्हाईस चेअरमन विकास दंडवते उपस्थित होते.

 

हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा 

भारत सरकार संलग्न असलेल्या आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या माध्यमातून संपुर्ण देशात नागरिक, महिला, कामगार वर्ग, व्यावसायिक व लहान मुलांच्या न्याय, हक्कासाठी कार्य सुरु आहे. पिडीतांना त्यांचे हक्काची जाणीव करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबध्द असून, नुकतेच बोल्हेगाव येथे संघाचे संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले असून, सामाजिक कार्य करणार्‍या युवकांना पदाच्या माध्यमातून संधी दिली जात असल्याचे जिल्हा चेअरमन प्रा. पंकज लोखंडे यांनी सांगितले.

 

 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय, अल्पसंख्यांक समाजावर अन्याय, अत्याचार होत आहे. पोलीस यंत्रणा व शासकीय पातळीवर राजकीय दबाव आल्याने पिडीतांना न्याय मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे. अशा घटनांना वाचा फोडून आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघ पिडीतांना न्याय देण्यास कटिबध्द राहणार आहे. तसेच संघाच्या माध्यमातून कार्य करणार्‍यांना देखील पाठबळ दिला जाणार असल्याची भावना राज्य कार्याध्यक्ष रविराज साबळे यांनी व्यक्त केली.  सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित जिल्हा सचिव शरद महापूरे यांनी मानव अधिकार संघाच्या ध्येय धोरणाप्रमाणे कार्य करुन दुर्बल घटकांना त्यांचे हक्क मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या निवडीबद्दल त्यांचे संतोष वाघ, संदीप ठोंबे, अनिल गायकवाड, नितीन साठे, डॉ. सचिन दरंदले, गंगाराम झावरे, विजय दुबे, जावेद सय्यद, गोरख पवार, अमित लोखंडे यांनी अभिनंदन केले.