यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी

जिजाऊंच्या संस्काराने मुले घडल्यास मुलींनी समाजात कोणतीही भिती राहणार नाही -मायाताई कोल्हे

नगर (प्रतिनिधी)- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती उत्सव साजरा करण्यात आला. महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
पाढंरी पूल येथील आठवण हॉटेलच्या परिसरात झालेल्या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी यशवंतीच्या संस्थापिका मायाताई कोल्हे, जिल्हाध्यक्षा तथा माजी उपमहापौर गितांजलीताई काळे, उपाध्यक्षा कविता दरंदले, कार्याध्यक्षा तथा माजी महापौर शिलाताई शिंदे, माजी शहराध्यक्ष आशाताई शिंदे, शेळके मॅडम, मिनाक्षी जाधव, सुनिता जाधव, वर्षा लगड, मोरे मॅडम, नंदा मुळे, शैला थोरात, सारीका खादंवे, मंगल शिरसाठ, प्रतिभा भिसे, डॉ. संध्या कवडे, डॉ. किशोर, भिसे काका आदींसह महिला उपस्थित होत्या.
मायाताई कोल्हे म्हणाल्या की, राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. भावी पिढी समोर महिलांनी राजमाता जिजाऊंचा आदर्श समोर ठेवल्यास सक्षम भारताचा पाया रोवला जाणार आहे. जिजाऊंचा आदर्श समोर ठेऊन सर्वच महिलांनी मुलांना संस्कार दिल्यास मुलींना समाजात कोणतीही भिती बाळगण्याची गरज पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गीतांजली काळे यांनी युवकांनी राजमाता जिजाऊंचा आदर्श समोर ठेऊन वाटचाल करावी व महिलांना सन्मानाची वागणुक देण्याचे आवाहन केले. शिलाताई शिंदे यांनी उपस्थित महिलांना राजमाता जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कविता दरंदले यांनी एकीच्या बळाचे महत्त्व सांगून, आनंदी जीवन जगण्याचा संदेश दिला.