भगवा सप्ताहानिमित्त मूकबधिर विद्यालय व वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप युवा सेनेचा उपक्रम
शिवसेनेची नेहमीच वंचित उपेक्षितांना आधार देण्याची भूमिका राहिली -योगेश गलांडे
नगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शहरात भगवा सप्ताहाने साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर युवा सेनेच्या पुढाकाराने भिस्तबाग, सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मूकबधिर विद्यालय व वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबुशेठ टायरवाले, शहर प्रमुख सचिन जाधव, दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, शहर प्रमुख महेश लोंढे, आकाश कातोरे, माजी नगरसेवक दिपक खैरे, दत्ता जाधव, प्रशांत गायकवाड, अमोल हुंबे, आनंदराव शेळके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योगेश गलांडे म्हणाले की, शिवसेनेची नेहमीच वंचित उपेक्षितांना आधार देण्याची भूमिका राहिली आहे. दिव्यांग विद्यार्थी देखील समाजातील एक घटक असून, त्यांच्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील घटक असलेले दिव्यांग विद्यार्थ्यांकडे समाजाचे दुर्लक्ष होत आहे. वंचित, दुर्लक्षीत घटकातील विद्यार्थ्यांना आधाराबरोबर प्रेम देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
सचिन जाधव म्हणाले की, स्व. बाळासाहेबांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देवून कार्य केले. हाच त्यांचा विचार घेऊन शहरात शिवसेना कार्यरत आहे. वंचित, उपेक्षितांचे प्रश्न सोडवित असताना, दुर्लक्षीत घटकांना देखील जवळ करुन त्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वस्तीगृहातील मुलांना आठशे रुपयाचे अनुदान डबल करुन सोळाशे रुपये करण्यात आले. जनहिताचे कार्य करुन उपमुख्यमंत्री शिंदे स्व. बाळासाहेबांचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.