तब्बल 58 वर्षानंतर झेंगच्या हातात टेनिस रॅकेट

व्हिडिओ गेमच्या व्यसनापासून मुलाला वाचवण्यासाठी तयारी

क्रीडा जगताच सहजासहजी यश मिळत नाही. त्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. अनेक सवयी लावून, विशिष्ट वयानंतर खेळणं हे एक आव्हान असते. त्यामुळे यांच्या मते, मुलाच्या निमित्ताने का होईना, मला माझी टेनिसची रॅकेट पुन्हा हातात घेता आली. याचा आनंदच आहे. पण आता ही रॅकेट हातात घेण्यामागे मुख्यतः मुलाला व्हिडिओ गेम्स वाचून वाचवण्याचा माझा प्रयत्न आहे. याबाबत बोलताना झेंग पुढे म्हणाली, माझे वडील अभियंता होते. आणि आई चीनच्या वांग झू प्रांतात टेबल टेनिस प्रशिक्षक होती. आईनेच मला लहानपणापासून टेबल टेनिस प्रशिक्षण दिलं. अकराव्या वर्षी मी सगळ्यात पहिल्यांदा आर्मी स्पोर्ट्स स्कूलच्या ज्युनिअर संघात समावेश मिळवला होता. त्यावेळी चीनमधील व्यावसायिक खेळाडूंना सैन्य प्रशिक्षण देत होते. 1983 मध्ये माझी राष्ट्रीय टेबल टेनिस संघात निवड झाली. पण 86 मध्ये दोन रंगांच्या रॅकेटचा नियम लागू झाला. या दोन रॅकेटच्या नियमामुळे मला प्रतिस्पर्धी कुठल्या पद्धतीने खेळणार आहे हे समजत होते. पण मी मात्र एकाच पॅडल्सने खेळायचे. या नवीन नियमामुळे माझा खेळ मात्र खराब झाला. कारण दोन रंगांच्या रॅकेट्समुळे मला व्यवस्थित खेळता येईना.मी खूप खचले. आणि परिस्थिती पुढे इतकी बिघडली की, राष्ट्रीय संघापासून पूर्णपणे वेगळी झाले. त्यानंतर मी चिलीमध्ये राहून आयातीचा व्यवसाय सुरू केला. जो उत्तम चालेला होता. पण पुढे पुढे मुलाचा व्हिडिओ गेम्स मला त्रास देत होते. त्याचे लक्ष वळवण्यासाठी मी त्यालाही टेबल टेनिसची ओळख करून दिली. क्लबमध्ये घेऊन जाऊ लागले. त्या ठिकाणी माझ्या खेळाची अधिक चर्चा झाली. मी स्थानिक स्पर्धेत भाग घेतला. आणि सगळ्यांना पराभूत केले. यातून माझ्या मुलालाही प्रेरणा मिळाली. यानंतर कोरोना काळात माझा टेबल टेनिस संबंध आणखी वाढला. जास्तीत जास्त वेळ मी टेबल टेनिस साठी देऊ लागले. आणि मुलालाही अधिक चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण देऊ लागले. त्यामुळे चिलीच्या लाॅकडाऊन दरम्यान चिंता कमी करण्यासाठी मी टेबल टेनिस टेबल विकत घेतल, आणि तासनतास एकटीने सराव केला. स्थानिक स्पर्धा खेळून जिंकत राहिले. 2020 मध्ये मी चिलीची सर्वोच्च क्रमांकची महिला खेळाडू बनले आणि राष्ट्रीय संघात माझी निवड झाली. माझ्या या पूर्वीच्या खेळाने मला, माझ्या मुलाला व्हिडिओ गेम सारख्या व्यसनापासून बाहेर काढण्यासाठी मदत मिळाली. त्यामुळे मला माझा आत्मविश्वास ही परत मिळाला. एकूणच टेबल टेनिस या खेळामुळे मायलेकांना उत्तम आयुष्य मिळाले असे म्हणायला हरकत नाही.