गुलमोहोर रोड श्री स्वामी समर्थ मंदिरात दत्त माऊली पिठापुर पादुका दर्शनास भाविकांची गर्दी

नगर – सावेडी उपनगरात गुलमोहोर रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान पिठापुर (आंध्रप्रदेश) येथील दत्त माऊली यांच्या पादुकांचे आगमन झाले असून आज गुरुवार दि.22 जून रोजी सकाळी अभिषेक, हवन पूजा होऊन दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.

     श्री स्वामी समर्थ मुर्तीस पहाटे अभिषेक करण्यात आला. नृसिंह सरस्वतीचे रुपात श्री स्वामी समर्थ यांना सजावट केली. त्यांचे मोहक रुप स्वामी भक्त बघतच राहिले. दत्त माऊली (पिठापुर) यांच्या पादुकांच्या दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. तरी भाविक शिस्तबद्ध शांतपणे दर्शन घेत होते.

     श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या पादुका दर्शन निमित्ताने ‘अभंग गायन सेवा’ सावेडी मधील विविध भजनी मंडळाने दिली. यामध्ये बोपर्डीकर मॅडम, देशपांडे मॅडम, अनुजा कुलकर्णी, श्रेया सुवर्णपाठकी, ओंकार देऊळगावकर, आनंद कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. प्रसाद सुवर्णपाठकी यांनी साथ संगत केली तर माणिक देव यांनी निरुपण केले.

     या पादुका दर्शन व पालखी सोहळ्याचे नियोजन श्री स्वामी समर्थ मंदिराचे सुनिल मानकर, पंकज गुजराथी, गिरिष धर्माधिकारी, संजय देशपांडे, निखिल देवरे, तसेच सावली सोसायटीमधील स्वामी भक्तांनी केले.