महावीर इंटरनॅशनल युवा केंद्राच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप
नगर – सामजिक क्षेत्रात योगदान देत मदत कार्य करणार्या नगरच्या महावीर इंटरनॅशनल युवा केंद्राच्या वतीने शहरातील रामकरण सारडा विद्यार्थिगृह, माळीवाडा येथील महात्मा फुले वसतीगृह, तारकपूर येथील कै.बाजीराव पाटील वसतीगृह व नागापूरच्या मूकबधिर विद्यालयातील सुमारे 100 हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य ठेवण्यासाठी दप्तरांचे वाटप करण्यात आले. रामकरण सारडा विद्यार्थिगृहात झालेल्या कार्यक्रमात हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, माजी कार्याध्यक्ष अजित बोरा, महावीर इंटरनॅशनल युवा केंद्राचे अध्यक्ष स्वप्नील डुंगरवाल, उपाध्यक्ष संतोष बाफना, सचिव शैलेंद्र कोठारी आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रा.शिरीष मोडक म्हणाले, ज्यांना शिक्षणाची तळमळ आहे अशा गरजू विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करणे हे अत्यंत पवित्र काम आहे. महावीर इंटरनॅशनल युवा केंद्राच्यावतीने हा महत्वाचा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना मदत केली आहे. या उपक्रमाचे अनुकरण सर्वांनी करावे, असे आवाहन केले.
स्वप्नील डुंगरवाल म्हणाले, महावीर इंटरनॅशनल ही संस्था संपूर्ण भारतासह विदेशांमध्येही काम करत आहे. प्रत्येक समजातील गरजूंसाठी काम करत आहे. अशा संस्थेचे आम्ही पदाधिकारी असल्याचा आम्हला सार्थ अभिमान आहे. भारताचे पुढील भवितव्य आजच्या या लहान मुलांच्या हातात आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण घेता यावे यासाठी महावीर इंटरनॅशनल युवा केंद्र प्रयत्शील असल्याचे सांगितले.
यावेळी अजित बोरा यांनी महावीर इंटरनॅशनलच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. मनोज शेटिया यांनी प्रास्ताविक केले. अजय महाजन यांनी सूत्रसंचालन केले. सीए संदीप देसार्डा यांनी आभार मानले.
यावेळी महावीर इंटरनॅशनलचे दिनेश संकलेचा, रोषण चोरडिया, वीरेंद्र संकलेचा, आशिष देसार्डा, सचिन नहार, प्रितम गांधी, चेतन संचेती, सुदर्शन डुंगरवाल, अरुण पारख, मनोज शेटीया, सचिन चोपडा, दिलीप डुंगरवाल, संदेश लोढा, जयकुमार मुनोत, रसिकलाल कोठारी, योगेश मुनोत आदी उपस्थित होते.