अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या दहावी बोर्डातील शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

यशाने हुरळून न जाता, ध्येय ठेऊन वाटचाल करा -अशोक मुथा

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल, रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल व भिंगार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या चारही शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.
अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात झालेल्या गुणगौरव कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी व नियामक मंडळाच्या सदस्या सुनंदा भालेराव यांच्या हस्ते शाळेच्या गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब फिरोदियाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, अशोकभाऊ फिरोदियाचे मुख्याध्यापक प्रभाकर भाबड, रूपीबाई बोराचे मुख्याध्यापक अजय बारगळ, भिंगार हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र बेद्रे यांच्यासह शालेय शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
अशोक मुथा म्हणाले की, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शाळेतील प्रत्येक शिक्षक योगदान देत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशात पालक व शिक्षकांचा देखील वाटा आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आई-वडील व गुरुजनांचा आदर करा, ध्येय ठेऊन वाटचाल करा, यशाने हुरळून जाऊ नका, आवड असलेल्या क्षेत्राकडे वळण्याचे त्यांनी सांगितले. तर ज्ञान ही सर्वात मोठी संपत्ती असून, ती चोरी जात नसल्याने ज्ञानसंपन्न होण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रारंभी सरस्वती पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात समृद्धी बिबवे यांनी वाढता गुणवत्तेचा आलेख सादर केला.गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया व सहकार्यवाह गौरव फिरोदिया यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या नावांची घोषणा राजेंद्र उगले यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शुभांगी जोशी यांनी केले. आभार वैशाली वाघ यांनी मानले.
या गौरव सोहळ्यात इयत्ता दहावी मधील शालेय गुणवत्ता यादीत चमकलेल्या पुढील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल प्रथम- वैष्णवी तरटे (99 टक्के), द्वितीय- अर्पिता निकम (98.60 टक्के), तृतीय- वैष्णवी मेहेत्रे (98 टक्के), चौथा- अपाला कुलकर्णी (97.40 टक्के), पाचवा- महेश पोकळे, दिशा लोंढे (97.20 टक्के), सहावी- सायली कानडे (97 टक्के), सातवी- सृष्टी कराड, निकिता झेंडे (96.80 टक्के), आठवा- प्रणव झेंडे, संस्कार गिरवले (96.60), तसेच 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे 80 विद्यार्थी आहे. तर संस्कृत विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवणारे 10 आणि गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवणारे 2 विद्यार्थी आहेत.
अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल प्रथम- प्रसाद मोरे (95 टक्के), द्वितीय- मुग्धा कुलकर्णी (94.40 टक्के), तृतीय- संस्कार गायकवाड, प्रांजल पांढरकर (94.20 टक्के), चौथी- समृध्दी कुताळ (93.80 टक्के), पाचवी- इफरा फातेमा (93.20 टक्के), सहावा- आकाश दहातोंडे (93 टक्के), सातवा- प्रज्ञेश लुनिया (92.80 टक्के), आठवी- हर्षदा हिंगे (92.60 टक्के), नऊवा- निखील कडू, देवर्षि टाक, अरिहंत पोखरणा (92.20 टक्के), दहावा- अमेय बोरगे (91.80 टक्के), 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे 23 विद्यार्थी असून, समृध्दी कुताळ हिने संस्कृतमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवले आहे.
रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल प्रथम-सिध्दी नहार (95.60 टक्के), द्वितीय- रोशनी बनकर (95.20 टक्के), तृतीय- ऋतूजा जाधव (93 टक्के), चौथा- सिध्दार्थ खराडे (92.20 टक्के), पाचवी- आकांशा कारभळ (91.80 टक्के), सहावी- सानिका कांबळे (91.40 टक्के), सातवा- शांतीराज चोकते समृध्दी घोडके, तनुजा जाधव (90.80 टक्के),  आठवी- मधुरा गोरे (90.60 टक्के), नऊवी- चैत्राली चोरडिया (90.40 टक्के).
भिंगार हायस्कूल प्रथम-आदिती केसकर (93 टक्के), द्वितीय- मानसी गलांडे (92.40 टक्के), तृतीय- आकांक्षा गावडे (92 टक्के), चौथा- आदित्य जाधव (91 टक्के), पाचवी- मधुरा माळवदे (90.80 टक्के), वैष्णवी आठरे (90 टक्के).