आ. लंकेंच्या पाठपुराव्यानंतर अकरा गावांमध्ये मुक्कामी बस पुरवत

पारनेर: कोरोना काळात सन 2020 पासून प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला आलेली मरगळ व त्यामुळे तोट्यात चाललेल्या परिवहन महामंडळाने तांत्रिक अडचणीमुळे अनेक गावांमधील मुक्कामी बसेस बंद केल्या होत्या. दैनंदिन कामकाजासाठी तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक व इंग्रजी माध्यमातील पारनेर शहरात असणाऱ्या शाळा व त्या शाळेत शिकणारे विद्यार्थी तसेच पारनेर शहरात असणारे तहसील कार्यालय, पंचायत समिती, कोर्ट अशा या शासकीय कार्यालयात, खेड्यापाड्यातून येणारे प्रवासी तसेच रात्रीच्या वेळी इतर जिल्ह्यातून येणाऱ्या ग्रामस्थांना या मुक्कामी गाड्या बंद झाल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे जावे लागत होते. सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, या 11 गावातील पदाधिकारी नेतेमंडळी व ग्रामस्थांनी पारनेर नगर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आग निलेश लंके यांच्याशी संपर्क केला होता आलके यांनीही वारंवार पारनेर आगाराचे व्यवस्थापक अमोल कोतकर यांच्याशी संपर्क करून सदर अकरा गावांमध्ये मुक्कामी बस सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली होती. आगार व्यवस्थापक कोतकर यांनी सदर गावाच्या मुक्कामी बसेस चालू चालू शैक्षणिक वर्षांपासून जून पासून पुन्हा सुरू करत असून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रासाठी विद्यार्थी 65 त्वरित काढून घेण्याचे आवाहन केले आहे. पारनेर आगाराचे दोन वाहतूक नियंत्रक सर्व शाळा आणि महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना पासचे वाटप करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्थानकावर पास काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तसेच महामंडळातर्फे 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासी योजनेचा व महिला प्रवाशांना प्रवासात 50 टक्के सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. कोतकर यांनी केले आहे. मुक्कामी एसटी बस सेवा सुरू होणारी गावं- वरणवाडी कोतुळ, जवळा वासुंदे, सुरेगाव, गुणोरे, पिंपरी, जलसेन, डोंगरवाडी, तीखोल, कळस वणकुटे या गावांचा समावेश आहे. सदर बसेस पुन्हा सुरू होत असल्याने या गावांसह परिसरातील प्रवासी, उद्योजक व व्यावसायिकांनी आ.लंके व आगार व्यवस्थापक कोतकर यांचे आभार मानले आहेत.