कॉन्व्हेंन्ट शाळेचा माज उतरविण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल – सुमित वर्मा

शिक्षणाच्या नावाखाली धर्मप्रसार चालू आहे की काय याची आता खात्री पटायला लागली.आम्ही कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत यांची थेरं पोहचवतोय की हे शाळेचा धर्म प्रसारासाठी वापर करताय .आज कॉन्व्हेंन्ट च्या प्रवेशासाठी वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी वेगवेगळ्या वेळा ठरवून प्रवेशासाठी यावे अशी नोटीस विद्यालयाच्या परिसरात लावलेली होती , बरं या मध्ये बुद्ध , शीख , पारशी , ख्रिश्चन , मुस्लिम अशी धर्माचा जातींचा उल्लेख आहे पण हिंदू धर्माचा उल्लेख का नाही ? खरं तर धर्माच्या नावाने प्रवेश प्रक्रिया यालाच आमचा विरोध आहे आणि याला आम्ही सडेतोड उत्तर देणार. हा काय प्रकार आहे ? कोणा शिक्षण मंडळ , मंत्रालय , शासकीय यंत्रणेचा काही धाक आहे की नाही यांना ? हे उपरे मागे बोलले होते की आम्ही या कोणत्याही यंत्रणांना घाबरत नाही मग आम्ही आता यांना घाबरणं काय असतं हे दाखवून देऊ . येत्या २ दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या बाबत शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून जाब विचारणार आणि जर काही कारवाई झाली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने व्यवस्था करु असे प्रतिपादन  जिल्हाध्यक्ष  सुमित वर्मा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांनी केले .