मंगलाबाई बडदे यांचे अल्पशा आजाराने निधन

 मंगलाबाई बडदे यांचे अल्पशा आजाराने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील कोष्टी समाजाच्या ज्येष्ठ महिला मंगलाबाई कृष्णा बडदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 87 वर्षाच्या होत्या. अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभाव असल्याने त्या सर्वांना सुपरिचित होत्या. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. भिंगार कोष्टी समाजाचे संचालक दीपक बडदे व नितीन बडदे यांच्या त्या मातोश्री होत्या.