राज्याभिषेक दिन सोहळा दादा चौधरी विद्यालयात साजरा

स्वराज्याचे सुराज्य होण्यासाठी नव्या पिढीने काम करावे - प्रा.शिरीष मोडक

नगर – छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या स्वराज्याची स्थापना करून सर्वसामान्य जनतेला न्याय दिला. स्वराज्याच्या स्थापनेचे 350 वे वर्ष आपल्याला साजरे करण्याची संधी मिळाली हे आपले भाग्याच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बुद्धिचातुर्य, युद्ध कौशल्य, राजनीती व योग्य न्याय निवाडा या गुणांना आत्मसात करून स्वराज्याचे सुराज्य होण्यासाठी नव्या पिढीने काम करावे, असे आवाहना हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी केले.

     छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दादा चौधरी विद्यालयात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून उत्सहात 350 वे वर्ष साजरे करण्यात आले. यावेळी प्रा.शिरीष मोडक बोलत होते. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, दादा चौधरी विद्यालयाचे अध्यक्ष अनंत देसाई, मुख्याध्यापक मधुकर साबळे, पा.ड.क.वी.शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी फळे, सहाय्यक सचिव बी.यू.कुलकर्णी, मनोज हिरणवाळे, गजेंद्र धर्माधिकारी, सुनील सकट, सुजय रामदासी, प्रसाद एडके, डी.एम.शिंदे आदी उपस्थित होते.

      अजित बोरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेवून सर्वांनी त्यांचे चरित्र आत्मसात करावे, असे आवाहन केले.

      प्रास्ताविकात अनंत देसाई म्हणाले, दादा चौधरी शाळा भारतीय संस्कृतीवर चालणारी शाळा आहे. प्रत्येक सन उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरे होतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेकदिन शाळेत साजरा करताना मोठा अभिमान वाटत आहे.