रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी च्यावतीने सन्मानचिन्ह प्रदान
फुंदे दाम्पत्याचं कार्य कौतुकास्पद -पद्मश्री गिरीश प्रभुणे
नगर – शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबरोबर आपण समाजाच देणं लागतो, या भावनेतून सेवाश्रय फाऊंडेशन या संस्थेची स्थापना करत समाजकार्य करणार्या सौ.अनुराधा फुंदे व पोपटराव फुंदे या शिक्षक दाम्पत्यांस रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी च्यावतीने मुंबई येथील ‘हुरुप एक-जन संमेलन’ या विशेष कार्यक्रमात पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुध्दे, श्रीकांत पटवर्धन, जयंत कुलकर्णी आदि उपस्थितीत होते.
राज्यभर नावलौकिक असलेल्या मोहटादेवी देवस्थानच्या विश्वस्त अनुराधा फुंदे या प्रामाणिक व पारदर्शी कामाबाबत परिचित आहेत. आपल्या वेतनातील पैसे खर्च करत गरजू वंचित अनाथ मुलांच शैक्षणिक पालकत्व स्विकारत त्यांचे शिक्षण आरोग्य यासह विधवा भगिनींना उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध करुन देणं तसेच गरजू कुटुंबातील मुलींच कन्यादान करुन देत आपल्या घासातला घास दीनदुबळ्यांना देवून त्यांना जगण्यास बळ देणारं फुंदे दाम्पत्य आपल्या निरपेक्ष कार्यामुळे इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी सारख्या नामांकित संस्थेने दखल घेत केलेल्या सन्मानामुळे अनाथ निराधारांसाठी काम करण्यास मोठा हुरुप मिळाल्याचं अनुराधा फुंदे यांनी सांगितलं.