सोशल ,मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल केली , अटक आरोपीस न्यायालयाने दिला अखेर जामीन

सोशल मिडीयावर धार्मिक पोस्ट व्यय्रल केल्या प्रकरणी झाली होती अटक

धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी आरोपीची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कडून जामीन मंजूर
पुणे (प्रतिनिधि) सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी आरोपी नामे कुंडलिक जाधव यांस दिनांक १६ जून रोजी  दत्तवाडी पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी आरोपी हा येरवडा कारागृहात होता. आरोपीचे वकील ॲड.आदेश चव्हाण ,  ॲड. दिपाली धनंजय काळभोर , ॲड. सुलेमान शेख  यांच्या वतीने जामिनासाठी मे. न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आरोपीचे वकील यांनी आरोपीने केलेल्या सोशल मीडियावर पोस्ट केलेले वादग्रस्त असे कुठलेही पुरावा पोलिसांनी तपासात मे न्यायालयासमोर  सादर केला नाही तसेच आरोपी हा सुरक्षारक्षक असून या घटनेशी त्याचा संबंध नाही. ॲड आदेश चव्हाण ,ॲड. दिपाली धनंजय काळभोर , ॲड. सुलेमान शेख  यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत शिवाजीनगर येथील मे. प्रथम वर्ग न्यायालयाने आरोपीस अटी शर्तीवर जामीन मंजूर केला.