मार्केट कमिटी व्यापारी असोसिएशन यांच्यावतीने जिल्हाधिकारी व आयुक्त यांना निवेदन.

शहरातील बाजार समिती चा भाजीपाला विभाग बंद झाल्याने शेतमालास कवडीमोल भाव.

भाजीपाला-फळे हे रोज दैनंदिन जिवनातला अविभाज्य घटक असून अहमदनगर शहरातील बाजार समिती भाजीपाला विभागास विक्रीस मुभा देण्यात यावी या मागणीचे निवेदन मार्केट कमिटी व्यापारी असोसिएशन च्या वतीने जिल्हाधिकारी व महानगर पालिकेच्या आयुक्त कडे मागणी करण्यात आली. अहमदनगर शहरातील नागरिकांना जिल्हाअधीकारी यांनी कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावास नियंत्रणात अन्यासाठी मुख्य कृषी उत्पन्न बाजर समीती  येथील भाजीपाला विभाग हा बंद झाल्यानंतर विक्री प्रणाली नसल्याने शेतकरी तसेच ठोक माल खरेदीदार याच्यांत समनव्य साधण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या भाजीपाला विभाग कोठी रोड येथील विभागा मार्फत भाजीपाला विभाग सुरू करून द्यावा हा जवळ जवळ ८- ते १० एकर अश्या मुबलक  परीसरात असलेल्याने तसेच बाजरसमीती प्रशासनाने व आरोग्य विभागाने दिलेल्या उपाययोजनाचे पालन करून सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टंस, कंप्लसरी मास्कचा वापर करून सुरक्षित व्यवसाय करु ज्यामुळे शेतकरयाचें  होणारे आर्थिक नुकसान टळेल व शहरवाशियांना देखील भाजीपाला उपलब्ध होईल
तरी आपण हया सर्व बाबींचा विचार करून भाजीपाला विभागातील व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दयावी अशी मागणी करण्यात आली आहे.