स्त्रीयांचे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे उद्घाटन संपन्न

कै.वै.पं. गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्रियांचे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे उद्घाटन जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष श्री सुभाष जी गुंदेचा यांच्या हस्ते व आदरणीय आमदार अरुणकाका जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

याप्रसंगी बोलताना पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्री सुभाषजी गुंदेचा म्हणाले की,मोफत आरोग्य शिबिरे होणे ही काळाची गरज असून आमदार संग्राम जगताप यांचे आरोग्य सेवेतील काम कौतुकास्पद आहे. या धकाधकीच्या युगामध्ये स्त्रियांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत कुटुंबाकडे लक्ष देण्याचे काम करत असतात, त्यामुळे महिलांच्या आरोग्याची तपासणी झाल्यास आजारपणावर उपचार घेण्यास मदत होत असते. आ. संग्राम जगताप यांचे कोरोना काळातील काम कौतुकास्पद आहे. त्यांनी मोफत स्त्रियांचे आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करून आरोग्य सेवेचे काम केले असल्याचे प्रतिपादन पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा यांनी केले.

यावेळी आदरणीय आमदार अरुणकाका जगताप, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते,महिला शहर जिल्हाअध्यक्ष रेश्मा ताई आठरे, डॉ.विजय भंडारी,अर्बन सेलचे अध्यक्ष प्रा.अरविंद शिंदे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष वैभव ढाकणे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार,युवतीचे जिल्हा अध्यक्ष अंजली आव्हाड, संजय सपकाळ, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, साधना बोरुडे,संतोष ढाकणे, सुजाता दिवटे, गणेश बोरूडे,डॉ. निलेश शेळके, डॉ. पौर्णिमा जगताप,डॉ.माधुरी देशमुख आदी उपस्थित होते.

वैभव ढाकणे म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी आरोग्य शिबिराचे आयोजन करून सर्वसामान्य रुग्णांना या शिबिराचा लाभ होणार आहे. आज महिलांसाठी मोफत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये मोफत औषध वाटप, मोफत हिमोग्लोबिन तपासणी, ऑपरेशन मध्ये विशेष सवलत,मोफत वैद्यकीय सल्ला, सोनोग्राफी मध्ये सवलत, शिबिरास येण्या-जाण्यासाठी ॲम्बुलन्स बसची व्यवस्था केली होती. या शिबिरामध्ये डॉ. निलेश शेळके, डॉ. पोर्णिमा जगताप,डॉ. माधुरी देशमुख यांनी रुग्णांची तपासणी करून मोफत औषधांचे वाटप करण्यात आले आहे. अशी शिबिरे वेळोवेळी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणार असल्याचे माहिती ढाकणे यांनी दिली.