कारागृह सबजेल येथील मुख्य जेलर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी
ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी
राजू काते हा खोट्या ३७६ या कलमाखाली अहमदनगर मध्यवर्ती कारागृह सबजेल येथे बंदी असून त्याची केस सत्र न्यायालय सेशन कोर्ट यांच्या कोर्टात चौकशीवर आहे. त्याची तारीख २ फेब्रुवारी २०२३ रोजी होती .
सदर तारखेस मुलाने आपल्या वडीलाकडे जेलर यांच्याविरुद्ध शिवीगाळ व बेदम मारहाण केल्याची तोंडी तक्रार केली होती. ही बाब जेलर यांना समजताच पुन्हा बेदम मारहाण केली. आणि “मी नाशिक जेल वरून बदली होऊन आलेलो आहे . नाशिक सेंट्रल जेलमधील कैद्यांना मी सरळ केलेले आहे. मी कुणाला घाबरत नाही , असे सांगत नगरमध्ये २०० कैदी आहेत , त्यांना मी सरळ करणार आहे, कोठेही कारवाई करा , कोणत्याही अधिकाऱ्यास सांगा”, असे ते म्हणत असतात.
त्यामुळे माझ्या मुलास नाहीतर बाकीच्या कैद्यांना पण बेदम मारहाण करून गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत असून माझ्या मुलाच्या जीवितास काही धोका झाल्यास त्यास हे जेलर पाटीलच जबाबदार राहतील असे राजू शंकर काते यांचे वडील साहेबराव शंकर काते यांनी निवेदनात म्हटले आहे.आणि राजू साहेबराव काते यांना जातीय वाचक शिवीगाळ करून मारहाण केलेली आहे.
त्यामुळे जेलर पाटील त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी न्यायालयात व पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदनाद्वारे साहेबराव शंकर काते समवेत पोपट पात्रे, विक्रम गायकवाड, सुशिलाबाई काते, किशोर पटेकर, संतोष साळवे, पांडुरंग घोरपडे, सीमा काते, अनिता जाधव, दत्तात्रेय जाधव यांनी केली आहे.